राजू काकडे हेल्प अ‍ॅकॅडमीचे काम कौतुकास्पद

By Admin | Updated: December 12, 2015 00:19 IST2015-12-11T21:50:18+5:302015-12-12T00:19:39+5:30

संजय शिंदे : जयराम केसरकर यांना समाजसेवी पुरस्कार; संस्थानच्या रूग्णवाहिका चालकाचा सत्कार

The work of Raju Kakad Help Academy is appreciated | राजू काकडे हेल्प अ‍ॅकॅडमीचे काम कौतुकास्पद

राजू काकडे हेल्प अ‍ॅकॅडमीचे काम कौतुकास्पद

देवरूख : राजू काकडे हेल्प अ‍ॅकॅडमी करत असलेले काम सर्वच संस्था, संघ यांना मार्गदर्शक असून हे आदर्शवत काम देवरुखला नवीन ओळख व नाव मिळवून देईल, असे गौरवोद्गार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी देवरूख येथे राजू काकडे हेल्प अ‍ॅकॅडमीच्या सातव्या वर्धापनदिनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना काढले.
अ‍ॅकॅडमीतर्फे दिला जाणारा यंदाचा समाजसेवी पुरस्कार जयराम सखाराम ऊर्फ दादा केसरकर यांना प्रदान करण्यात आला. तसेच गेली ५० वर्षे साप व सर्पदंशावर अचूक उपचार करणारे व शेकडो जणांचे प्राण वाचवणारे सोनारवाडी येथील तुकाराम कांबळे यांचा अ‍ॅकॅडमीतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. अ‍ॅकॅडमीच्या शिस्तबद्ध व आगळ्या वेगळ्या कामाचा बळीराम सावंत, नगराध्यक्ष नीलेश भुरवणे, सदानंद भागवत यांनी विशेष उल्लेख
केला.
चिपळूणच्या सह्याद्री निसर्गमित्र या संस्थेच्या सहकार्याने भाऊ वाघधरे यांच्या माध्यमातून तब्बल १६ जणांनी यावेळी देहदानाचे अर्ज भरुन एक वेगळाच विक्रम केला व राजू काकडेला श्रद्धांजली वाहिली.
यावेळी नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या रूग्णवाहिकेचे चालक प्रसाद सप्रे यांचा सत्कार करण्यात आला. महामार्गावरील अपघातातील जखमींवर तातडीने उपचार सुरू व्हावेत, यासाठी संस्थानतर्फे मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू आहे. यावेळी संस्थानच्या रुग्णवाहिका सेवा विभागाचे प्रमुख राजन बोडेकर, श्रद्धा बोडेकर आदींची उपस्थित होती. त्यांनी संस्थानच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. (प्रतिनिधी)

Web Title: The work of Raju Kakad Help Academy is appreciated