शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

Women's Day Special : ग्रुपमध्ये पहिली कॅडेट,परटवणे येथील मैथिलीची एनसीसीत भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 3:40 PM

एनसीसीत सहभागी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मैथिली सुनील सावंत या विद्यार्थिनीने एनसीसीत सामील होऊन डीजी कमांडेशन कार्ड (महानिदेशक यांचे प्रशंसापत्र) पटकावले. कोल्हापूर ग्रुपमधील पाच जिल्ह्यांमध्ये प्रथमच हे पदक पटकावण्याचा मान तिने मिळवला आहे.

ठळक मुद्देपाच जिल्ह्यांतील कॅडेटमध्ये प्रथमच मानदिल्ली दरबारातून डिजी कमांडेशन कार्डने सन्मानित

अरुण आडिवरेकर 

रत्नागिरी : पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचे साऱ्यांनाच आकर्षण असते. त्यातही पांढऱ्या रंगाचा पोशाख घालून परेड करण्याचे स्वप्न प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात असते. हाच पोशाख अंगावर चढवून एनसीसीत सहभागी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मैथिली सुनील सावंत या विद्यार्थिनीने एनसीसीत सामील होऊन डीजी कमांडेशन कार्ड (महानिदेशक यांचे प्रशंसापत्र) पटकावले. कोल्हापूर ग्रुपमधील पाच जिल्ह्यांमध्ये प्रथमच हे पदक पटकावण्याचा मान तिने मिळवला आहे.रत्नागिरीतील परटवणे येथील सामान्य कुटुंबात राहणाऱ्या मैथिलीचे वडील खासगी गाड्यांवर चालक म्हणून काम करतात तर आई घरीच असते. फाटक हायस्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण घेत असताना ती एनसीसीमध्ये सामील झाली. त्याचवेळी कॅडेटचा पोशाख आपण परिधान करायचा, असे स्वप्न तिने उराशी बाळगले.

गोगटे - जोगळेकर महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यानंतर ती एनसीसीत सामील झाली. एनसीसीतील लेफ्टनंट कॅप्टन सीमा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तिने एनसीसीचे धडे गिरवण्यास सुरूवात केली.एनसीसीचा पोशाख परिधान केल्यावर झालेला आनंद शब्दात व्यक्त करू शकत नसल्याचे मैथिली अभिमानाने सांगते. त्या पोशाखाने दिलेली ऊर्जा आयुष्यभराची कमाई असल्याचे ती सांगते. शीप मॉडेलिंगमधील तिची आवड लक्षात घेऊन तिचे शीप मॉडेलिंगचे प्रशिक्षण सुरू झाले.

शशिकांत जाधव यांच्या माध्यमातून शीप मॉडेलिंगच्या प्रशिक्षणाला सुरूवात झाली आणि नौदलातील युद्धनौकांची शास्त्रोक्त माहिती तिने संपादित केली. शीप मॉडेलिंग करत असताना, दिल्ली येथील आरडीसी कॅम्पमध्ये सहभागी होण्याचे शाळेपासूनचे स्वप्न सत्यात उतरल्याचा क्षण खूप मोठा असल्याचे मैथिलीने सांगितले.

व्हीटीपी मॉडेल प्रकारात मैथिलीने सादर केलेल्या ह्यआयएनएस दिल्लीह्ण या नौकेला पहिले राष्ट्रीय रौप्यपदक मिळाले आणि मैथिलीने यशाच्या दिशेने एक पाऊल टाकले.ह्यनीलगिरी ट्रेकिंग कॅम्प २०१७ह्ण मध्ये महाराष्ट्राच्या ६० मुलींचे नेतृत्व तिने केले होते. बोट पुलिंगमध्ये रौप्य तर शीप मॉडेलिंगमध्ये कांस्यपदक पटकावून आपली घोडदौड सुरूच ठेवली. एनसीसी डे २०१८मध्ये महानिदेशक यांचे प्रशंसापत्र प्राप्त झाल्याचा क्षण सुवर्णक्षण असल्याचे ती सांगते.

कोल्हापूर ग्रुपच्या इतिहासात प्रथमच एका कॅडेटला हा सन्मान मिळाला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांतून हा सन्मान मिळविणारी ती एकमेव कॅडेट आहे. आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळे आपण हे यश मिळविल्याचे सांगून त्यांच्या कष्टाचे चीज तिला करायचे आहे.सैन्यातील पोशाख हवा

शिस्त, एकता, शौर्य, नेतृत्व आणि सैन्यदलातील आवड निर्माण करणारे एनसीसी हे ऊर्जा देणारे माध्यम आहे. भारतीय सैन्यात सामील होऊन सैन्यातील एका पोशाखावर आपले नाव लागावे, असे स्वप्न मैथिली सावंत हिने उराशी बाळगले आहे. त्यासाठी तिची धडपड सुरु आहे.

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनRatnagiriरत्नागिरी