शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा वाळू उत्खननाला आशीर्वाद कोणाचा, चिपळूण तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 17:35 IST

चिपळूण : सर्वोच्च न्यायालयाने सक्शन पंपाने वाळू उपसण्यावर बंदी आणलेली असतानाही येथील करंबवणे -बहिरवली खाडीत सक्शन पंपाने अवैध वाळू ...

चिपळूण : सर्वोच्च न्यायालयाने सक्शन पंपाने वाळू उपसण्यावर बंदी आणलेली असतानाही येथील करंबवणे -बहिरवली खाडीत सक्शन पंपाने अवैध वाळू उत्खनन सुरू आहे. याप्रकरणी अनेक तक्रारी होत असल्याने जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी गंभीर दखल घेत या बेकायदा वाळू उत्खननाला कोणाचा आशीर्वाद आहे, असा प्रश्न चिपळूणचे तहसीलदार प्रवीण लोकरे यांना केला आहे. याबाबत पाठवलेल्या पत्रात त्यांनी तातडीने कारवाई करून तसा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.तालुक्यातील करंबवणे बहिरवली खाडीत गेल्या काही महिन्यांपासून रात्रदिंवस सक्शन पंपाद्वारे बेकायदा वाळू उत्खनन केले जात असल्याची ओरड सुरू आहे. याबाबत संबंधित मंडल अधिकारी, तलाठी व स्थानिक अधिकारी याकडे कानाडोळा करीत असल्याच्या तक्रारी होत आहेत. मात्र, तरीही कारवाई होत नाही. अखेर काही दिवसांपूर्वी जिल्हा खनिकर्म विभागाने कारवाई येथे कारवाई केली. मात्र, त्यानंतरही चोरटा वाळू व्यवसाय सुरू आहे.

सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली असतानाही करंबवणे, मालदोली गावातून सक्शन पंपाद्वारे बेकायदेशीर आणि विनारॉयल्टी वाळू उत्खनन सुरू आहे. याबाबत तीन तक्रार अर्ज चिपळूण तहसीलदार लोकरे यांच्याकडे देऊनही कारवाई होत नसल्याचे संबंधित तक्रारदाराने जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे. त्याची जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी गंभीरपणे दखल घेतली आहे.

खेड, दापोलीतही वाळूचोरीचिपळूणमधील करंबवणे, मालदोलीसह खेड तालुक्यातील बहिरवली, दिवा बेट, दापोली तालुक्यातील आंजर्ले, केळशी, हर्णे, म्हसोंडा, सारंग, मालदोली, अडखल, मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ आदी ठिकाणी सेक्शन पंपाद्वारे बेकायदा वाळू उत्खनन सुरू आहे. त्यामुळे याठिकाणीही कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गेले काही महिने चिपळूण हद्दीत वाळू उत्खनन पूर्णतः बंद आहे. भरारी पथकामार्फत दिवस रात्र गस्त घातली जात आहे, तसेच तक्रार येतात तातडीने कारवाईदेखील केली जात आहे. - प्रवीण लोकरे, तहसीलदार, चिपळूण

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणsandवाळू