शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

मध्यरात्री खोल दरीत कार कोसळली; देवरूख पोलिस देवदूत बनून आले, अन् कोल्हापूरचे दाम्पत्य बचावले

By अरुण आडिवरेकर | Updated: April 10, 2023 16:08 IST

घाटात समोरून आलेल्या वाहनाचा प्रखर प्रकाश डोळ्यावर पडल्याने समोर रस्ता दिसला नाही आणि काही सेकंदामध्येच कार थेट १०० फूट खोल दरीत कोसळली.

देवरुख : खेडमधून काेल्हापूरकडे जात असताना कार १०० फूट खाेल दरीत काेसळल्याची घटना ८ एप्रिल राेजी मध्यरात्री रत्नागिरी - काेल्हापूर मार्गावरील साखरप्यापासून २ किलाेमीटर अंतरावर मुरडे घाटात घडली. कार खोल दरीत कोसळूनही संयम न सोडता तातडीने ११२ क्रमांकावरून माहिती दिल्याने अवघ्या १५ मिनिटात देवरुख पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गाडीतून तिघांना सुखरुप बाहेर काढत जीव वाचवला. या अपघातग्रस्त कुटुंबियांसाठी देवरूखचे पाेलिसच देवदूत बनून आले हाेते.कोल्हापूरचे विनायक मढवळ (३३), पत्नी सिद्धी मढवळ (३२) आणि त्यांची मुलगी मीरा (४) हे कारने (एमएच ०९, एफजे ८९७२) खेडमधून कोल्हापूरला जात होते. रत्नागिरी - काेल्हापूर मार्गावरील साखरप्यापासून पुढे २ किलाेमीटर अंतरावर मुरडे घाटात समोरून आलेल्या वाहनाचा प्रखर प्रकाश डोळ्यावर पडल्याने विनायक यांना समोर रस्ता दिसला नाही आणि काही सेकंदामध्येच कार थेट १०० फूट खोल दरीत कोसळली.कार दरीत कोसळली, त्यावेळी मध्यरात्रीचे २ वाजले होते. विनायक यांच्या पत्नी सिद्धी यांनी मोठ्या धैर्याने नातेवाईकांना आणि ११२ नंबरवरून देवरूख पोलिसांना मध्यरात्री २ वाजून ९ मिनिटांनी फाेन केला. त्यांनी माहिती देत आमचा अपघात झाला असून, आम्हाला तत्काळ मदत हवी असल्याचे सांगितले.देवरुख पोलिस स्थानकात राहुल गायकवाड होते. ते पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत नागवेकर, चालक पोलिस कॉन्स्टेबल तानाजी पाटील यांच्यासह अवघ्या १५ मिनिटांत घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोरीच्या मदतीने दरीत उतरून प्रथम गाडीच्या डिकीतून मुलगी मीरा हिला तर त्यानंतर विनायक आणि सिद्धी यांना सुखरूप दरीतून बाहेर काढले.मध्यरात्री कोणीही मदतीला नसताना देवरूख पोलिसांच्या या मदतीमुळे मढवळ दाम्पत्याला अश्रू अनावर झाले. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच हे कुटुंब या अपघातातून बचावले. देवरुख पाेलिसांनी दाखविलेल्या या तत्परतेबाबत त्यांनी त्यांचे आभार मानले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkolhapurकोल्हापूरAccidentअपघातPoliceपोलिस