शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ज्यांना मते दिलीत ते कुठे गेले आता?, मंत्री उदय सामंतांचा सवाल; रत्नागिरीत वक्फ मंडळ कार्यालयाचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 12:09 IST

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आणि देशाचे संविधान बदलले जाणार आहे याबद्दल ज्यांनी तुमच्या मनात विष पेरले आणि ...

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आणि देशाचे संविधान बदलले जाणार आहे याबद्दल ज्यांनी तुमच्या मनात विष पेरले आणि त्यामुळेच तुम्ही ज्यांना मते दिलीत ते उद्धवसेना आणि काँग्रेसचे लोक आज कोठे आहेत, असा प्रश्न उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केला. वक्फ मंडळाच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग कार्यालयाचे उद्घाटन सामाजिक न्याय भवन येथे मंत्री सामंत यांच्या हस्ते झाले.उदय सामंत म्हणाले, तुम्हाला जसा मशिदीचा अभिमान आहे, तसा मला मंदिराचा अभिमान आहे. प्रत्येकाला तो असतो. पण, लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आपण कधीही जातपात, धर्म पाहून काम करत नाही. मच्छीमार असोत किंवा अन्य कोणी, सर्वांच्या समस्या सोडविण्यावर माझा भर असतो. यावेळी त्यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. ज्यांना तुम्ही मते दिलीत, त्यांचा एकही पदाधिकारी, कार्यकर्ता वक्फ मंडळ कार्यालयाचे उद्घाटन होताना फिरकलासुद्धा नाही, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

तुमच्या मनात मुद्दाम विष पेरण्यात आलेउदय सामंत म्हणाले, तुमच्या मनात मुद्दाम विष पेरण्यात आले आहे. आता मोदी पंतप्रधान होऊन बरेच दिवस झाले. एकतरी मुसलमान बांधव देशाबाहेर गेला का? तुमच्यामध्ये जाणीवपूर्वक गैरसमज पसरवले जात आहेत. मात्र, तसे काही मनात ठेवू नका. आपण तुमच्या समस्यांसाठी नेहमी उभे असू, असेही ते म्हणाले.

मंडळाचे काम सहा महिन्यांपूर्वीच सुरूआज मंडळाचे उद्घाटन होत असल्याचे जे लोक सांगत आहेत, त्यांचा अभ्यास थोडा कमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी दिलेल्या पाठबळामुळे मंडळ सहा महिन्यांपूर्वीच सुरू झाले आहे. या कार्यालयातील अंतर्गत सजावटीचे काम आता पूर्ण झाले आहे. त्याचे उद्घाटन आज करण्यात आले, असे ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतMuslimमुस्लीमcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना