नाना पटोले यांचे चिपळुणात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:29 IST2021-05-24T04:29:51+5:302021-05-24T04:29:51+5:30
अडरे : तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी-सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांचे चिपळुणात शनिवारी रात्री ...

नाना पटोले यांचे चिपळुणात स्वागत
अडरे : तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी-सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांचे चिपळुणात शनिवारी रात्री जोरदार स्वागत झाले. चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. विशेष म्हणजे रात्री उशिरा १२.३० वाजता काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या स्वागताने नाना पटोले भारावून गेले.
तौक्ते चक्रीवादळाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरे, गोठे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले असून, जनावरेही मृत्युमुखी पडली आहेत. महावितरणचेही नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चिपळुणात आले हाेते. चिपळूण येथील बहादूर शेख नाका येथे आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष हुसेन दलवाई यांचेही स्वागत करण्यात आले. यावेळी अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष अन्वर जबले, तालुका प्रवक्ते वासुदेव मेस्त्री, शकील तांबे, युवक काँग्रेस विधानसभा क्षेत्राध्यक्ष महेश कदम, तालुका उपाध्यक्ष रुपेश आवले, चिपळूण शहर अध्यक्ष फैसल पिलपिले, विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष ऋषिकेश शिंदे, शहर उपाध्यक्ष मनोज दळी, युवक जिल्हा सरचिटणीस व शिरळ ग्रामपंचायत सदस्य गुलजार कुरवले, बंड्या साळवी, साजिद सरगुरोह, मुबिन आलेकर, सेवादल तालुकाध्यक्ष अश्फाक तांबे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी साजिद सरगुरोह यांची चिपळूण काँग्रेस तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र नाना पटोले यांच्या हस्ते देण्यात आले.
तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या आईचे निधन झाले असल्याने त्यांच्या घरी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाऊन यादव कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी स्वप्ना यादव, स्वामिनी यादव उपस्थित होते.
----------------------
चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हा दाैऱ्यावर आलेल्या काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांचे चिपळुणात स्वागत करण्यात आले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष माणिक जगताप, हुसेन दलवाई उपस्थित हाेते.