शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी शहरावर पाणीसंकटाचे ढग, आठवड्यातून दोन दिवस पाणी कपातीचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 12:42 IST

नागरिकांना यापुढे काटकसरीने पाण्याचा वापर करावा लागणार

रत्नागिरी : रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या शीळ धरणातीलपाणीसाठा कमी झाल्याने शहरवासीयांना आतापासूनच पाणी संकटाला सामोरे जावे लागणार आहे. रत्नागिरी नगर परिषदेने आठवड्यातून दोन दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना यापुढे काटकसरीने पाण्याचा वापर करावा लागणार आहे.

शीळ धरणाची साठवण क्षमता ४.३७१ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. गेल्यावर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात २.०८२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता. हाच पाणीसाठा सध्या १.८२८ दशलक्ष घनमीटर इतका आहे. शहरात १० हजार नळजोडण्या असून, दररोज रत्नागिरी शहराला १८ ते १९ दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा केला जातो. नियमित तेवढाच पाणीपुरवठा सुरू असला तरी आठवड्यातून दोन दिवस कपात केली तरच पाणीसाठा पुरणार आहे.पाण्याचे योग्य नियोजन झाले नाही तर पावसाळा सुरू होईपर्यंत धरणातील पाणी पुरणे अशक्य आहे. त्यामुळे आठवड्यातून दोन दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दर सोमवारी व गुरुवारी शहराला पाणीपुरवठा करण्यात येणार नसल्याने नागरिकांवर पाण्याचा वापर जपून करण्याची वेळ आली आहे.

‘अल-निनो’ या समुद्र प्रवाहाच्या सक्रियतेचा मान्सूनवर मोठा परिणाम झाल्याने सरासरी पर्जन्यमानापेक्षा गतवर्षी कमी पाऊस झाला. त्यामुळे शीळ धरणात पाणीसाठा कमी आहे. उष्म्यामुळे बाष्पीभवन होत असल्याने पाणीपातळी झपाट्याने घटत आहे. पाणीटंचाईवर मात करताना, मान्सून सुरू होईपर्यंत धरणातील शिल्लक पाणीसाठा पुरविण्याचे आव्हान नगर परिषद प्रशासनासमाेर आहे. पाणी कपातीचे नियोजन झाले नाही तर पावसाळा सुरू होईपर्यंत धरणातील पाणी पुरणे अशक्य आहे.

शीळ धरणामध्ये असलेला शिल्लक पाणीसाठा पावसाळा सुरू होईपर्यंत शहरवासीयांना पुरविण्यासाठी नियोजन करण्याची गरज आहे. म्हणून आता आठवड्यातून दोन दिवस म्हणजेच सोमवार आणि गुरुवार असा दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून नगर परिषदेला सहकार्य करावे. - तुषार बाबर, मुख्याधिकारी.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणीDamधरण