वारिशे कुटुंबीयांना २५ लाखांची मदत देणार : उदय सामंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 10:21 IST2023-02-13T10:21:05+5:302023-02-13T10:21:39+5:30
मुख्यमंत्री साहाय्यता निधी व इतर माध्यमातून मदतनिधी उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. वारिशे यांच्या मुलाला कायमस्वरुपी नोकरी मिळवून देण्याचेही आश्वासन त्यांनी दिले

वारिशे कुटुंबीयांना २५ लाखांची मदत देणार : उदय सामंत
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या झाली असून, आरोपींवर कारवाई सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी वारिशे कुटुंबीयांना २५ लाखांची मदत जाहीर केली आहे, अशी माहिती राज्याचे उद्याेगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुख्यमंत्री साहाय्यता निधी व इतर माध्यमातून मदतनिधी उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. वारिशे यांच्या मुलाला कायमस्वरुपी नोकरी मिळवून देण्याचेही आश्वासन त्यांनी दिले. मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून १० लाख व इतर माध्यमातून १५ लाख असे एकूण २५ लाखांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले.