शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

चौपदरीकरण पूर्ण होण्यासाठी डिसेंबर २०२२ ची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 18:19 IST

Highway Ratnagiri- मुंबई-गोवा महामार्गावर आरवली ते वाकेड या सुमारे ९१ किलोमीटर काम बराच काळ रखडले आहे. त्यामुळे हे काम पूर्ण होण्यास आता डिसेंबर २०२२ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभा खासदार सुरेश प्रभू यांना याबाबतची माहिती एका पत्रातून दिली आहे.

ठळक मुद्देआरवली ते वाकेड दरम्यान काम रखडलेले नितीन गडकरी यांचे सुरेश प्रभू यांना पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आरवली ते वाकेड या सुमारे ९१ किलोमीटर काम बराच काळ रखडले आहे. त्यामुळे हे काम पूर्ण होण्यास आता डिसेंबर २०२२ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभा खासदार सुरेश प्रभू यांना याबाबतची माहिती एका पत्रातून दिली आहे.महामार्गाच्या सद्य:स्थितीबाबत खासदार प्रभू यांनी माहिती विचारली होती. मुंबई ते गोवा या ४५० किलोमीटर महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेली तीन वर्षे सुरू आहे. त्यातील आरवली (संगमेश्वर) ते वाकेड (लांजा) या ९१ किलोमीटर मार्गाचे काम बराच काळ रखडले आहे. यातील आरवली ते कांटे या भागात ८.६१ टक्के, तर कांटे ते वाकेड या भागात १२ टक्के इतकेच काम तीन वर्षांत झाले आहे. हे काम पूर्ण होण्यास डिसेंबर २०२२ उजाडणार असल्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.४५० किलोमीटर मार्गाच्या रुंदीकरणापैकी २३० किलोमीटर मार्गाचे रुंदीकरण पूर्ण झाले आहे. आरवली ते वाकेड या दरम्यानचे काम डिसेंबर २०२२ पर्यंत संपविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असेही गडकरी यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. या कामाचा पाठपुरावा आपण करीत आहोत, असे खासदार प्रभू यांनी सांगितले.मार्ग                                        अंतर                   कामाचे टक्के

  • पनवेल ते इंदापूर                    ८४                    ८६.१४
  • इंदापूर ते वाडापळे             २४.४३०              २६.२८
  • वीर ते भोगाव खुर्द             ३९.५७०              ४५.६९
  • भोगाव खुर्द ते खवटी         १३.६००             ३३.२४
  • कशेडी ते परशुराम घाट     ४३.८००             ८०.००
  • परशुराम घाट ते आरवली ३५.९००         २४.००
  • आरवली ते कांटे               ४०.०००          ८.६१
  • कांटे ते वाकेड                   ५०.९००          १२.००
  • वाकेड ते तळगाव            ३५.०००            ८५.६
  • तळगाव ते कलमठ         ३८.८३०            ९२.००
  • कलमठ ते झाराप           ४४.१४०            ४१.२०

 

टॅग्स :highwayमहामार्गRatnagiriरत्नागिरी