शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने कमान सांभाळली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
5
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
6
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
7
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
8
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
9
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
10
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
11
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
12
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
13
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
14
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
15
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
16
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
17
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
18
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
19
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
20
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?

vidhan sabha assembly election result 2024: रत्नागिरीवर महायुतीचे वर्चस्व, उद्धवसेनेला मोठा धक्का

By मनोज मुळ्ये | Updated: November 23, 2024 16:58 IST

रत्नागिरी : पाचपैकी चार जागा जिंकून महायुतीने रत्नागिरी जिल्ह्यावरील आपले वर्चस्व कायम ठेवले. राजापूरचे विद्यमान आमदार राजन साळवी यांचा ...

रत्नागिरी : पाचपैकी चार जागा जिंकून महायुतीने रत्नागिरी जिल्ह्यावरील आपले वर्चस्व कायम ठेवले. राजापूरचे विद्यमान आमदार राजन साळवी यांचा पराभव झाल्याने उद्धव सेनेला मोठा धक्का बसला आहे. महायुतीचे विद्यमान आमदार उदय सामंत (शिंदे सेना), योगेश कदम (शिंदे सेना), शेखर निकम (राष्ट्रवादी अजित पवार) आणि महाविकास आघाडीचे भास्कर जाधव (उद्धव सेना) पुन्हा विजयी झाले आहेत. राजापूरमधून शिंदे सेनेचे किरण सामंत प्रथमच विधानसभेत गेले आहेत.जिल्ह्यात सर्वात चुरशीची निवडणूक चिपळूण आणि गुहागर या दोन मतदार संघात झाली. रत्नागिरी, राजापूर आणि दापोली या मतदारसंघात एकतर्फीच निकाल लागला आहे. चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) शेखर निकम यांनी प्रशांत यादव (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) यांचा पराभव केला. पहिल्या ९ फेऱ्यांमध्ये प्रशांत यादव यांनी ४२७१ मतांची आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर त्यांचे मताधिक्य घटत गेले आणि १३ व्या फेरीपासून शेखर निकम यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली. अखेर शेखर निकम यांनी साडेसहा हजाराहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला. गुहागर मतदारसंघातील निवडणूकही अटीतटीची झाली आणि उद्धव सेनेचे दिग्गज नेते भास्कर जाधव यांना केवळ २८३० मतांच्या फरकाने विजय मिळवला. पहिल्या काही फेऱ्यांमध्ये त्यांनी सहा हजाराहून आघाडी घेतली हाेती. मात्र नंतर शिंदे सेनेचे उमेदवार राजेश बेंडल यांनी त्यांनी चांगली लढत दिली. त्यामुळे भास्कर जाधव यांचे मताधिक्य कमी झाले.रत्नागिरीत शिंदे सेनेच्या उदय सामंत यांनी उद्धव सेनेच्या बाळ माने यांचा ४१,५९० मताधिक्याने पराभव केला. प्रथमच निवडणूक रिंगणात उतरलेल्या शिंदे सेनेच्या किरण सामंत यांनी राजापूरचे उद्धव सेनेचे विद्यमान आमदार राजन साळवी यांचा १९६७७ मताधिक्याने पराभव केला. दापोलीमध्ये शिंदे सेनेचे विद्यमान आमदार योगेश कदम यांनी उद्धव सेनेच्या संजय कदम यांचा पराभव केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024dapoli-acदापोलीguhagar-acगुहागरchiplun-acचिपळूणrajapur-acराजापूरratnagiri-acरत्नागिरीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024