Video: रत्नागिरीच्या समुद्रात मृतावस्थेत आढळला वेगळाच मासा, विषारी अन् काटेरीही
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 16:34 IST2022-05-11T15:47:46+5:302022-05-11T16:34:17+5:30
केंड मासे हे अतिशय विषारी असतात त्यांच्या स्कीनमध्ये किंवा आतड्यांमध्ये निरोटॉक्सिन असते, जे शरीरात लवकर भिनते

Video: रत्नागिरीच्या समुद्रात मृतावस्थेत आढळला वेगळाच मासा, विषारी अन् काटेरीही
रत्नागिरी - कोकण किनारपट्टीवर पर्यंटनासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात. त्यातच, पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही गर्दी वाढलेली असते. नुकतेच रत्नागिरीच्या भाट्ये समुद्रकिनारी एक आगळावेगळा काटेरी मासा पर्यटकांना आढळून आला आहे. समुद्रातील या माशाला "पारक्यूपाईन पफर" असे म्हटले जाते. आपल्याकडे मराठीमध्ये त्याला "केंड" मासा असेही संबोधतात. या माशाच्या वेगवेगळ्या प्रजाती आपल्याकडे सापडतात.
केंड मासे हे अतिशय विषारी असतात त्यांच्या स्कीनमध्ये किंवा आतड्यांमध्ये निरोटॉक्सिन असते, जे शरीरात लवकर भिनते. बऱ्याचदा असे आढळून आले आहे की, या निरोटॉक्सिनमुळे माणसे मृत झाली आहेत. जपानमध्ये हा मासा "फुगू" मासा म्हणून ओळखला जातो. हा मासा स्वतःचा बचाव करण्यासाठी शरीरामध्ये हवा भरून घेतो, त्यामुळे तो बलून सारखा फुगतो आणि पाण्यावर तरंगतो. या माशाला वाटत असणारा धोका टळल्यानंतर तो पूर्ववत आकारात येतो. हा मासा हाताळणे अतिशय धोकादायक असल्यामुळे त्याला कोणीही हाताळू नये, असे जलचर तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
रत्नागिरी - भाट्ये समुद्रकिनारी एक आगळावेगळा काटेरी मासा पर्यटकांना आढळून आला आहे. pic.twitter.com/pjqXRMBBib
— Lokmat (@lokmat) May 11, 2022