शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

व्हेरी गुड... किरीट सोमय्या आला का?, मनसेचे वैभव खेडेकर यांच्या कुर्त्याची सर्वत्र चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 19:34 IST

दरम्यान, किरीट सोमय्या उद्या, शनिवारी दापोली दौऱ्यावर येत आहेत. अनिल परब यांचे दापोली तालुक्यातील मुरूड येथे रिसॉर्ट असल्याचा आरोप करत, हे अवैध रिसॉर्ट तोडुया, असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.

रत्नागिरी : राजकीय मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही. जिल्ह्यात शिमगोत्सवाची धामधूम सुरु असताना खेडमध्ये भलताच राजकीय शिमगा पाहायला मिळाला. रंगपंचमीदिवशी मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी घातलेल्या कुर्त्याची भलतीच चर्चा सुरु होती.कुर्त्यावर लिहिलेल्या ‘व्हेरी गुड...व्हेरी गुड, किरीट सोमय्या आला का?’ ने साऱ्यांचेच लक्ष वेधले आणि या कुर्त्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात पसरली होती.दापोलीतील कथित ऑडिओ क्लिपमुळे शिवसेना नेते रामदास कदम यांचा ‘व्हेरी गुड... व्हेरी गुड’ हा शब्द चर्चेत आला होता. रामदास कदम यांनी पालकमंत्री अनिल परब यांच्या मुरुड येथील रिसॉर्टची माहिती किरीट सोमय्या यांना पुरवल्याचा आरोप राष्ट्रवादीचे संजय कदम आणि मनसेचे वैभव खेडेकर यांनी केला होता. त्यानंतर राजकीय गदाराोळ उडाला होता. या घटनेला चार ते पाच महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र, शिमगोत्सवातील रंगपंचमीला पुन्हा वैभव खेडेकर यांनी उजळणी केली.वैभव खेडेकर यांनी खेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रंगपंचमीचा कार्यक्रम आयोजित केला होता. रंगपंचमीनिमित्त त्यांनी लहान मुलांना रंग आणि पिचकारीचे वाटपही केले. या कार्यक्रमात त्यांनी पांढऱ्या रंगाचा कुर्ता परीधान केला होता. या कुर्त्यावर ‘व्हेरी गुड, किरीट सोमय्या आला का?’ असे लिहिलेले होते. रंगपंचमीचा उत्साह सुरु असतानाच वैभव खेडेकर यांनी घातलेल्या या  कुर्त्याने रंगपंचमीत राजकीय शिमगा पाहायला मिळाला.सोमय्या उद्या दापोली दौऱ्यावरदरम्यान, किरीट सोमय्या उद्या, शनिवारी दापोली दौऱ्यावर येत आहेत. अनिल परब यांचे दापोली तालुक्यातील मुरूड येथे रिसॉर्ट असल्याचा आरोप करत, हे अवैध रिसॉर्ट तोडुया, असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे. तर, राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम व शिवसेनेचे प्रभारी तालुकाप्रमुख ऋषी गुजर यांनी सोमय्या याना दापोलीतच रोखून धरणार असल्याचा इशारा दिला आहे. यामुळे दापोलीतील शिवसेना-राष्ट्रवादी विरुद्ध भाजप आमने सामने येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKirit Somaiyaकिरीट सोमय्याMNSमनसेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा