रत्नागिरी - प्रेमात पडल्यावर सुख-दु:खात, प्रत्येक प्रसंगात अखेरपर्यंत साथ देण्याची वचने अनेक जण घेतात. पण प्रत्यक्षात मोजकेच लोक अशी वचने पाळतात. मात्र काहींचं प्रेम अपवादात्मक असतं. अगदी मोठ्यात मोठ्या संकटाच्यावेळीही ते आपल्या जोडीदाराची साथ सोडत नाहीत. अशीच एक कहाणी रत्नागिरीमधून समोर आली आहे. इथे एका तरुणीने कॅन्सरग्रस्त तरुणासोबत लग्नगाठ बांधली आहे. खरंतर कॅन्सरचे नाव ऐकले तरी अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा उठतो. मात्र रत्नागिरीतील प्रथमेश आणि सोनाली यांच्या प्रेमात हा भयानक आजारही आड येऊ शकला नाही. रत्नागिरीजवळच्या एका गावात राहणाऱ्या प्रथमेशला वयाच्या 20 व्या वर्षी कर्करोग असल्याचे निदान झाले होते. त्यानंतर त्याला केमोथेरेपीसारख्या वेदनादायी उपचारांचा सामना करावा लागला. कॅन्सरचा सामना करत असलेल्या प्रथमेशची ही अवस्था त्याच्याच गावात राहत असलेल्या सोनालीने पाहिली होती. पेशाने नर्स असलेल्या सोनालीने या कठीण काळात त्याला आधार दिला. दरम्यान, दोघांची चांगली ओळखही झाली.
ValentinesDay2020 : या प्रेमाला उपमा नाही! अन् तिने घेतला कॅन्सरग्रस्त तरुणाशी विवाह करण्याचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 18:36 IST