आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:29 IST2021-03-24T04:29:11+5:302021-03-24T04:29:11+5:30
आबलोली : गुहागर तालुक्यातील आबलाेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १२ मार्चपासून प्रत्येक सोमवार, बुधवार, शुक्रवार या दिवशी ...

आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू
आबलोली : गुहागर तालुक्यातील आबलाेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १२ मार्चपासून प्रत्येक सोमवार, बुधवार, शुक्रवार या दिवशी कोविड-१९ लसीकरण करण्यात येणार आहे. ४५ ते ५९ वयोगटातील व्याधीग्रस्त व ६० वर्षांवरील सर्वांनी ही लस घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डी. एल. चरके यांनी केले आहे.
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोली, हेदवी व ग्रामीण रुग्णालय गुहागर येथे सध्या लसीकरण सुरू आहे. आबलोली येथे कोविड-१९ लसीकरण कक्षाचे उद्घाटन पंचायत समिती सदस्या पूर्वी निमूणकर यांचे हस्ते झाले. त्यावेळी तालुका आराेग्य अधिकारी डॉ. डी. एल. चरके माजी पंचायत समिती सभापती विलास वाघे, सरपंच तुकाराम पागडे, वैद्यकीय अधिकारी गट (अ) डॉ. ए. एच. गावड, तदर्थ वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. वाय. मुंढे उपस्थित हाेते.