रत्नागिरीत समुद्रकिनारी आढळला अज्ञाताचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 15:39 IST2020-02-25T15:36:15+5:302020-02-25T15:39:35+5:30
रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी भोवरी येथील समुद्रकिनारी सोमवारी सकाळी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.

रत्नागिरीत समुद्रकिनारी आढळला अज्ञाताचा मृतदेह
रत्नागिरी : तालुक्यातील काळबादेवी भोवरी येथील समुद्रकिनारी सोमवारी सकाळी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.
समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत रूतलेल्या स्थितीत हा मृतदेह आढळला आहे. काळबादेवी येथील रहिवासी दत्ता मयेकर सोमवारी सकाळी फेरफटका मारण्यासाठी समुद्रकिनारी गेले होते. त्यावेळी त्यांना हा मृतदेह दिसला. त्यानंतर त्यांनी जीवरक्षक आणि ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली.
पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीसही घटनास्थळी रवाना झाले आहेत. पोलिसांनी त्याठिकाणी पंचनामा करण्याचे काम सुरू केले असून, हा मृतदेह नेमका कोणाचा आहे याचा तपास पोलीस करत आहेत. मिरजोळी येथील मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर आता पुन्हा एकदा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.