नारायण राणे यांनी घेतली किरण सामंत यांची फिरकी

By मनोज मुळ्ये | Updated: March 18, 2024 13:32 IST2024-03-18T13:31:33+5:302024-03-18T13:32:49+5:30

रत्नागिरी : निवडणुकीची धामधुम, ताण या सगळ्यातही अनेकदा राजकीय नेते छोट्या छोट्या गोष्टीतून हास्यविनोद करतात. असाच प्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ...

Union Minister Narayan Rane took the spin of Kiran Samant | नारायण राणे यांनी घेतली किरण सामंत यांची फिरकी

नारायण राणे यांनी घेतली किरण सामंत यांची फिरकी

रत्नागिरी : निवडणुकीची धामधुम, ताण या सगळ्यातही अनेकदा राजकीय नेते छोट्या छोट्या गोष्टीतून हास्यविनोद करतात. असाच प्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे झाला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना नेते किरण सामंत यांची फिरकी घेतली आणि सर्वजणांनी त्यांला हसून दाद दिली.

माजी खासदार नीलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी किरण सामंत रविवारी मालवण येथे गेले होते. तेथे त्यांनी प्रथम केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आशीर्वाद घेतले. राणे यांनी त्यांची विचारपूस केली. त्यानंतर सामंत यांनी नीलेश राणे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

तो बुके मागे उभे असलेल्या स्वीय सहाय्यकाच्या हाती देण्यासाठी किरण सामंत यांनी तो मागे घेतला. हजरजबाबीपणासाठी प्रसिद्ध असलेले नारायण राणे लगेचच म्हणाले, अरे बुके परत काय घेतोस.... त्यांच्या या विधानाला किरण सामंत यांच्यासह सर्वांनीच हसून दाद दिली.

Web Title: Union Minister Narayan Rane took the spin of Kiran Samant