विजेचा धक्का बसून तरुणाचा अंत, नवेदर वाडीवर शोककळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 14:06 IST2019-07-01T14:05:46+5:302019-07-01T14:06:31+5:30

राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील नवेदरवाडी येथे घरात विजेचा धक्का बसून मंदार मनोहर शिंदे (वय २५) या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला. मंदारच्या मृत्यूने नवेदर वाडीवर शोककळा पसरली आहे.

The unfortunate end of the youth is shocking | विजेचा धक्का बसून तरुणाचा अंत, नवेदर वाडीवर शोककळा

विजेचा धक्का बसून तरुणाचा अंत, नवेदर वाडीवर शोककळा

ठळक मुद्देविजेचा धक्का बसून तरुणाचा अंत नवेदर वाडीवर शोककळा

राजापूर : तालुक्यातील आडिवरे येथील नवेदरवाडी येथे घरात विजेचा धक्का बसून मंदार मनोहर शिंदे (वय २५) या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला. मंदारच्या मृत्यूने नवेदर वाडीवर शोककळा पसरली आहे.

रविवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमाराला मंदार घरातील आतल्या खोलीत पाणी पिण्यासाठी गेला होता. खोलीत अंधार असल्याने त्याने लाईट लावला. त्याचक्षणी त्याला विजेचा मोठा धक्का बसला. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.

नातेवाईकांनी नाटे पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच नाटे पोलीस स्थानकाच्या पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील, पोलीस कर्मचारी कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला होता.

मंदारच्या मृत्यूचे वृत्त आडिवरे पंचक्रोशी पसरतात येथील ग्रामस्थांनी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली. रात्री उशिरा मंदारच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या मृत्यूची नोंद नाटे पोलिसांनी केली आहे.

Web Title: The unfortunate end of the youth is shocking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.