शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंचे उत्तर शाळेतील भांडणासारखे, ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर मंत्री उदय सामंतांनी केलं भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 18:13 IST

तीनही नेत्यांची मने घट्ट

रत्नागिरी : आमच्यातील वाद हे महाराष्ट्रापेक्षा छाेटे आहेत, असे सांगून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सकारात्मकता दाखवली आहे. पण, समाेरच्यांकडून कशा पद्धतीने ते कमी लेखण्यात आलं हे दिसलं आणि उद्धव ठाकरे यांचे उत्तर म्हणजे शाळेतील भांडणासारखे असल्याचे भाष्य राज्याचे उद्याेगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बाेलताना केले.रत्नागिरी दाैऱ्यावर आलेल्या मंत्री उदय सामंत यांनी रविवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, राज ठाकरे यांनी मुलाखतीत महाराष्ट्र आपल्या सगळ्यांपेक्षा माेठा आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला. आमची भांडणं महाराष्ट्रापेक्षा छाेटी आहेत, हे त्यांनी सांगितले. पण, त्याची लिंक कशी जाेडली गेली, का जाेडली गेली, कशामुळे जाेडली गेली, हे माहीत नाही. राज ठाकरे सकारात्मक बाेलले असतील, पण समाेरून अटी, शर्तींंवर ते आमच्यासाेबत आले पाहिजेत, भाजपाबराेबर त्यांनी बाेलता कामा नये, असे सांगण्यात आले. हे प्राथमिक शाळेतील भांडणासारखं राजकारणात सुरू झालं आहे. त्याचा विचार करण्याएवढे राज ठाकरे नक्कीच माेठे आहेत, असेही मंत्री सामंत म्हणाले.

तीनही नेत्यांची मने घट्टमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांची मने घट्ट आहेत, एकत्र आहेत आणि काॅंक्रीट आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणून आम्ही जिंकू असा विश्वास आहे.

अटी घालून नमवणे शक्य नाहीयुती काेणाबराेबर करायची हे राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. पण, ते स्वत:चा विचार असणारे आणि स्वत:चा विचार कधीही बाजूला न करणारे एक नेते आहेत. त्यामुळे त्यांना अटी घालून नमवणे काेणाला शक्य नाही. अटी, शर्ती घालून झुकणारे राज ठाकरे नाहीत. अटी घातल्यावर ते काेणाबराेबर युती करतील, असे मला वाटत नाही, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे