शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
2
सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट 
3
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
4
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, पतीने पत्नीला कुऱ्हाडीनं कापलं! नंतर पोलीस स्टेशनला जाऊन म्हणाला..
5
आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
6
जान्हवी कपूर विवाहबंधनात अडकणार? अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल; लग्नाची तारीख सांगितल्याची चर्चा
7
५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
8
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
10
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
11
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
12
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
13
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
14
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
15
बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध
16
भारतीय कंपन्या रशियन तेलाची खरेदी घटवणार; अमेरिकेकडून वाढवणार, तज्ज्ञांची माहिती
17
भारतातून ३०० कोटींच्या शेणाची निर्यात; आंतरराष्ट्रीय बाजारात गायीच्या शेणाला मागणी
18
अमेरिकन कामगारांवर अन्याय, एच-१बी व्हिसा शुल्क विरुद्धचे खटले लढू; ट्रम्प प्रशासनाचा निर्धार
19
२५० कोटी व्याजासह जमा करा तरच म्हणणे ऐकू! मुंबई मेट्रोची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
20
झुबीनचा मृत्यू कशामुळे? सिंगापूर पोलिस देणार पुरावे, CCTV फुटेज अन् जबाब दहा दिवसांत मिळणार

उद्धवसेनेच्या भास्कर जाधव यांचा निसटता विजय, शिंदेसेनेच्या राजेश बेंडलांनी कुठं मिळवली आघाडी.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 19:14 IST

गुहागर : गुहागर विधानसभा मतदारसंघात उद्धवसेनेचे भास्कर जाधव यांनी शिंदेसेनेचे राजेश बेंडल यांच्यावर २,८३० मतांचा निसटता विजय मिळवला. त्यामध्ये ...

गुहागर : गुहागर विधानसभा मतदारसंघात उद्धवसेनेचे भास्कर जाधव यांनी शिंदेसेनेचे राजेश बेंडल यांच्यावर २,८३० मतांचा निसटता विजय मिळवला. त्यामध्ये भास्कर जाधव यांनी चिपळूण तालुक्यातील ९२ मतदान केंद्रांवर २ हजार ५७६ व खेड तालुक्यातील ९० मतदान केंद्रांवर ५,७७० मतांची आघाडी घेतली, तर राजेश बेंडल यांना गुहागर तालुक्यातील १४० मतदान केंद्रांवर ५ हजार ७५४ मतांची आघाडी घेण्यात यश आले.भास्कर जाधव यांना पहिल्याच चार फेरीत मिळालेले ८,०००चे मताधिक्य निर्णायक ठरले. या फेऱ्या खेड तालुक्यातील होत्या. खेड तालुक्यातून जाधव यांना ५,७७० मतांची आघाडी मिळाली. खेड तालुक्यातील खाडीपट्ट्यातील शिरशी मोहल्ला, मोमके, मुंबके, अलसुरे, आष्टी येथे ४००हून अधिक, भोस्तेमधील दोन केंद्रांवर ४६४, कोंडिवली शिव बुद्रुक खोतवाडी असगणी या मतदान केंद्रांवर तीनशेहून अधिक मताधिक्य घेतले.खेड तालुक्यात राजेश बेंडल पूर्णपणे पीछाडीवर गेले. त्यांना केवळ खारीमधून १६२ व बहिरवली २०८ या दोन केंद्रांवर एवढेच मोठे मताधिक्य घेता आले.चिपळूण तालुक्यात २,५७६ मतांनी भास्कर जाधव आघाडीवर होते. यामध्ये कामथे व कामथे खुर्द दोन केंद्रांवर ६८८, भोममधील दोन केंद्रांवर ४४६, लोणारी बंदर ३००, कापरे, कातरोळी, कोकरे या केंद्रांवर त्यांनी २००हून अधिक आघाडी घेतली. राजेश बेंडल यांना वहाळमधील दोन केंद्रांवर ४६०, मुर्तवडे व कातळवाडी या केंद्रांवर ३५५ मताधिक्य मिळाले. पोसरे, आंबीडगाव, खेरशेत या केंद्रांवर २००हून अधिक मताधिक्य मिळाले.गुहागर तालुक्यातून राजेश बेंडल यांनी ५,७७० मतांची आघाडी घेतली. गुहागर खालचा पाट केंद्रावर ५०८, हेदवी ३६६, अंजनवेल कातळवाडी ३२८, तसेच भातगाव तिसंग व धक्का या दोन केंद्रांवर ३९२ मताधिक्य घेतले. कौंढर, काळसूर, पालशेत, शीर, मासू, नरवण या केंद्रांवर २००हून अधिक मताधिक्य मिळाले.भास्कर जाधव यांना पडवेतील दोन केंद्रांवर ५०४, गुहागर वरचापाट ४१५, शृंगारतळी ४७६, पालशेत ३०१, तसेच वरवेली, सुरळ, रामानेवाडी, कौंढर काळसूर येथून २०० मताधिक्य मिळाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४guhagar-acगुहागरBhaskar Jadhavभास्कर जाधवUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेनाthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024