शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीला दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेते पदाची संधी?, आमदार भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 13:29 IST

नाराजीमुळे दखल?

चिपळूण : उद्धवसेनेकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी आमदार भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याने गेले महिनाभर विरोधी पक्षनेतेपदाभोवती घोंगावणारे वादळ काहीसे शांत झाले आहे. यापूर्वी रामदास कदम यांनी विरोध पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळली होती. आता महाविकास आघाडीकडून या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्यास कोकणला तिसऱ्यांदा विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळेल.विरोधी पक्षांकडे आवश्यक संख्याबळ नसल्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाबाबत प्रश्नचिन्हच होते. सरकार सक्षमपणे चालविण्यासाठी विरोधी पक्षनेत्याची आवश्यकता असते आणि त्याच भावनेतून कमी संख्याबळ असतानाही विरोधी पक्षनेतेपद महाविकास आघाडीला देण्याचे निश्चित करण्यात आले. महाविकास आघाडीमध्ये या पदासाठी रस्सीखेच सुरू होती. अखेर अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरवत हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या पदासाठी गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांसह उद्धवसेनेत उत्साह निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी आमदार जाधव हे पक्षात नाराज असल्याची चर्चा होती. आपली क्षमता असूनही आपल्याला म्हणावी तशी संधी मिळाली नाही, असे बोलून आमदार जाधव यांनीही आपली नाराजी मांडली होती. आता पक्षाने विरोधी पक्षनेतेपदाची संधी देण्याचा विचार केल्याने या निर्णयाचे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.

नाराजीमुळे दखल?

  • उद्धवसेनेला आमदार भास्कर जाधव यांच्या रूपाने कोकणात एकमेव जागेवर यश मिळाले आहे. ३३ वर्षांहून अधिक काळ ते राजकारणात सक्रिय आहेत. सहा वेळा ते आमदार झाले आहेत. राष्ट्रीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भूषवण्याचा मानही कोकणात केवळ त्यांच्याकडेच आहे.
  • यावेळी विरोधी पक्षनेतेपदासाठी आपली निवड व्हावी, ही त्यांची अपेक्षा होती. त्याबाबत पक्षाकडून काहीच हालचाल होत नसल्याने ते काहीसे नाराज होते. त्यांच्या या नाराजीची दखल घेतल्याची प्रतिक्रिया त्यांचे समर्थक व्यक्त करत आहेत.
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेvidhan sabhaविधानसभाBhaskar Jadhavभास्कर जाधव