शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

उदय सामंत दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री, भाजप आमदाराचा पराभव करुन पहिल्यांदा विधानसभेत केला होता प्रवेश

By मनोज मुळ्ये | Published: August 09, 2022 1:02 PM

२०१९ साली सलग चौथ्यांदा आमदार झालेले उदय सामंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात प्रथम कॅबिनेट मंत्री झाले.

मनोज मुळ्येरत्नागिरी : सन २००४ पासून तब्बल अठरा वर्षे सलग रत्नागिरी विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या उदय सामंत यांनी तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. एकदा राज्यमंत्री तर एकदा कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले होते. आता दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली.१९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र झाल्यानंतर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून ते प्रथम प्रकाशझोतात आले. २००४ साली वयाच्या २९व्या वर्षी त्यांनी विद्यमान भाजप आमदाराचा पराभव करुन प्रथम विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर २००९च्या निवडणुकीतही ते विजयी झाले. त्या टर्ममध्ये २०१३ साली ते नगरविकास, बंदरे, वने अशा नऊ खात्यांचे राज्यमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री झाले.२०१४ साली विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि आधीपेक्षा वाढीव मताधिक्याने विजयी झाले. २०१४ ते २०१९ या काळात मंत्रिपद नसले तरी त्यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले. २०१६ साली ते विधानमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष होते., २०१८ साली महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली.२०१९ साली सलग चौथ्यांदा आमदार झालेले उदय सामंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात प्रथम कॅबिनेट मंत्री झाले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री म्हणून आपल्या अडीच वर्षाच्या कार्यकालात त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यापीठाला एकापेक्षा अधिकवेळा भेट दिली आणि तेथील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले. हे कॅबिनेट मंत्रिपद देतानाच त्यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचीही जबाबदारी देण्यात आली. त्यांच्या पाठपुराव्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयाची प्रक्रिया सुरू झाली आहे. रत्नागिरीतील वैद्यकीय महाविद्यालयालाही सरकारने तत्त्वत: मान्यता दिली आहे. त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळेच रामटेकच्या कवि कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे उपकेंद्र रत्नागिरीत सुरू झाले आहे.एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकावल्यानंतर उदय सामंत यांनी त्यांची साथ देण्याचा निर्णय घेतला. आमदारकी आणि मंत्रिपदाचा अनुभव लक्षात घेत मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यातच त्यांना मंत्रिपद मिळेल अशी शक्यता होती आणि तसेच घडले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतEknath Shindeएकनाथ शिंदेministerमंत्री