शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
2
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
3
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
4
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
5
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
6
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
7
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
8
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
9
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
10
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
11
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
12
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
13
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
14
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
15
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
16
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
17
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
18
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
19
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
20
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील दोन सोने व्यापाऱ्यांना कोल्हापुरातील व्यापाऱ्याने तीन कोटीला फसविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 15:21 IST

याप्रकरणी पोलिस तपास करीत आहेत

रत्नागिरी : येथील दोन सोने व्यापाऱ्यांची कोल्हापूर येथील सोने व्यापाऱ्याकडून तब्बल ३ कोटी २ लाख ६६ हजार ९३० रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित व्यापाऱ्यांच्या व्यवस्थापकाने कोल्हापूर येथील विनायक बंडूजी पोतदार व त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात शहर पोलिस स्थानकात तक्रार दिली आहे.रत्नागिरीतील तक्रारदार राजेंद्र वसंत चव्हाण (रा. खेडेकर संकुल झाडगाव, रत्नागिरी) हे रत्नागिरीतील अर्हम् गोल्ड आणि ए. जी. गोल्ड फर्म या दोन ठिकाणी मॅनेजर म्हणून काम पाहतात. फर्मचा मुंबई व रत्नागिरी येथे सोन्याचा होलसेल व्यापार आहे. तक्रारदार चव्हाण यांनी कोल्हापूर येथील व्यापारी विनायक बंडूजी पोतदार यांच्या माध्यमातून सोन्याचे व्यवहार केले.रत्नागिरीतील श्रीकृष्ण ज्वेलर्सचे मालक चंद्रकांत सागवेकर यांनी विनायक पोतदार यांच्यासोबत ओळख करून दिल्याचे तक्रारदार चव्हाण यांचे म्हणणे आहे. दि. १८ फेब्रुवारी २०२५ आणि १ मार्च २०२५ रोजी झालेल्या सोन्याच्या व्यवहारासाठी तक्रारदार चव्हाण यांनी २२ कॅरेट सोन्याचे सुमारे १ किलो ९८७ ग्रॅम इतके सोन्याचे दागिने पोतदार यांना विकले होते. या व्यवहाराची एकूण किंमत १ कोटी ५० लाखांपेक्षा अधिक होती. याचप्रमाणे इतर बिलांचे मिळून एकूण ३ कोटी २ लाख ६६ हजार ९३० रुपये इतका आर्थिक व्यवहार झाला होता. मात्र, त्यातील रक्कम पोतदार यांच्याकडून अदा करण्यात आली नाही.तक्रारदाराच्या नावाने धनादेश देण्यात आले. मात्र पेमेंट स्टॉप बाय ड्रॉवर अशा कारणावरून बँकेकडून परत आले. विनायक पोतदार यांनी दिलेले धनादेश अनुक्रमे १ कोटी ५० लाख २८ हजार ३०७ रुपये आणि १ कोटी ५२ लाख ३८ हजार ६२३ रुपये इतक्या रकमांचे होते. मात्र, हे दोन्ही धनादेश बँकेकडून थांबविण्यात आले.

यानंतर संबंधित व्यापाऱ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. या प्रकरणात तक्रारदार चव्हाण दिलेल्या तक्रारीवरुन विनायक बंडूजी पोटदार व त्यांचे सहकारी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Trader Allegedly Defrauds Ratnagiri Gold Merchants of ₹3 Crore

Web Summary : Two Ratnagiri gold traders were allegedly defrauded of ₹3 crore by a Kolhapur-based trader, Vinayak Potdar. Checks issued bounced, prompting a police complaint. Investigation ongoing.