शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी ठाकरे बंधू मोर्चास्थळी निघाले; आदित्य-अमित ठाकरेही सोबत आले
2
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
3
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
4
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
5
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
6
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
7
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
8
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
9
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
10
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
11
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
12
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
13
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
14
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
15
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
16
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
17
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
18
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
19
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
20
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?

रत्नागिरी जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईची झळ कमी होणार, श्रमदानातून दोन हजार बंधारे बांधून पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 16:04 IST

विहिरींची पाणीपातळीही वाढण्यास मदत

रत्नागिरी : ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत दरवर्षी बंधारे उभारले जातात. यंदाही श्रमदानातून २,४९१ बंधारे बांधण्यात आले असून, त्यामध्ये लाखो लिटर पाणी साठले आहे.उशिरापर्यंत पाऊस पडल्याने बंधारे बांधण्याचे काम काहीसे लांबणीवर पडले. त्यामुळे जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईही लांबण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गावातून वाहणारे नाले, वहाळ आणि उपनद्या यावर तात्पुरते बंधारे बांधून तेथे पाणी साठवले जात आहे. श्रमदानातून हे बंधारे उभारले जात आहेत. त्यामध्ये कच्चे, वनराई आणि विजय बंधाऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यासाठी ८ हजार ६६५ बंधाऱ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.एप्रिल, मे महिन्यांत कडाक्याच्या उन्हाळ्यात पाणीपातळी कमी होते. काही ठिकाणी विहिरी पूर्णत: कोरड्या पडतात. त्यावेळी पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. मात्र, गावागावांत, वाड्यावाड्यांमध्ये बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्यांमुळे पाणीटंचाई लांबण्यास मदत होते. चालू वर्षी आतापर्यंत जिल्ह्यात श्रमदानातून ९९४ कच्चे बंधारे, १०३२ विजय बंधारे आणि ४६५ वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत.विहिरींची पातळी वाढतेबंधाऱ्यांतील पाण्याचा उपयोग सिंचनासाठी, कपडे धुणे, गाई-गुरांसाठी केला जातो. तसेच बंधारा बांधल्यानंतर अडलेले पाणी जमिनीत जिरते आणि किनाऱ्यावरील विहिरींची पाणीपातळीही वाढण्यास मदत होते.

तालुकानिहाय बंधाऱ्यांची संख्यातालुका - बंधारे

  • मंडणगड - १६१
  • दापोली - ५७१
  • खेड - ८२
  • गुहागर - १५०
  • चिपळूण - ५२५
  • संगमेश्वर - ४०५
  • रत्नागिरी - २५२
  • लांजा - २२३
  • राजापूर - १४५
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणीdroughtदुष्काळ