शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

लांजात रेल्वे पुलाच्या भिंतीला ट्रक आदळून सांगलीच्या दाेघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 13:32 IST

लांजा (जि. रत्नागिरी) : रेल्वे पुलाच्या भिंतीला ट्रक आदळून झालेल्या अपघातात चालकासह क्लिनरचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात लांजा ...

लांजा (जि. रत्नागिरी) : रेल्वे पुलाच्या भिंतीला ट्रक आदळून झालेल्या अपघातात चालकासह क्लिनरचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात लांजा तालुक्यातील कुरचुंब-तळवडे मार्गावर तळवडे येथे साेमवारी रात्री ८:३० वाजण्याच्या दरम्यान झाला. भरधाव वेगाने जात असताना उतारात वाहनावर नियंत्रण न राहिल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.चालक कमलाकर भागप्पा केंगार (२८, रा. आसंगी तुर्क-पांडोझरी, जत, सांगली) आणि क्लिनर कमलाकर शिवराम जेजगे (१७, रा. जाडरबाेबलाड, जत, सांगली) अशी मृत्यू झालेल्या दाेघांची नावे आहेत. कमलाकर केंगार हा चिरे भरून ट्रक (केए- २८, डी- ५३१२) घेऊन सापुचेतळे येथून चिरा भरून सोमवारी सायंकाळी निघाला होता. लांजा येथून आसगे मार्गे दाभोळे रस्त्याने जात असताना तळवडे येथील उतारात चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रक कुरचुंब-तळवडे येथे असलेल्या कोकण रेल्वे पुलाच्या भिंतीला धडकला. ही धडक इतकी जबरदस्त हाेती की, ट्रकच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. या अपघातात चालक कमलाकर केंगार व क्लिनर कमलाकर जेजगे यांचा जागीच मृत्यू झाला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू