दोन अल्पवयीन मुलांनी चोरली दुचाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:33 IST2021-04-22T04:33:04+5:302021-04-22T04:33:04+5:30
आवाशी : तालुक्यात दुचाकी चोरीच्या तक्रारीवरून खेड पोलीस ठाण्यातून तपास सुरू असताना केवळ चारच दिवसात या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात ...

दोन अल्पवयीन मुलांनी चोरली दुचाकी
आवाशी : तालुक्यात दुचाकी चोरीच्या तक्रारीवरून खेड पोलीस ठाण्यातून तपास सुरू असताना केवळ चारच दिवसात या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात खेड पोलिसांना यश आले आहे.
खेड पोलीस स्थानकात चार दिवसांपूर्वी दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. खेड पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन संशयित चोरांचा गेले चार दिवस शोध घेत होते. अनेक संशयित इसमांकडे तपास केल्यानंतर पीरलोटे परिसरातील दोन अल्पवयीन मुलांकडे त्यांनी कसून तपास केला. यावेळी त्यांनी हीरोहेंडा स्प्लेंडर प्लस गाडी (एमएच ०८ वाय ४२९६) चोरी केल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून चोरीची दुचाकीदेखील हस्तगत करण्यात आली आहे.
या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी खेड, पोलीस निरीक्षक नीशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम, पोलीस नाईक चरणसिंग पवार, पोलीस अंमलदार विनायक येलकर, विशाल धाडवे व रुपेश जोगी यांनी केला.