शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

Shiv Sena: कोणता हा झेंडा घेऊ हाती? सामान्य शिवसैनिकांचा संभ्रम कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 19:24 IST

शिंदे यांच्या बंडाबाबत नेमकी कारवाई पक्षाकडून केली जात नसल्याने त्या गटातील संख्या रोज वाढतच आहे. त्यामुळे शिवसैनिकांचा संभ्रम वाढतच चालला आहे.

मनोज मुळ्येरत्नागिरी : शिवसेनेच्या जिल्ह्यातील चार आमदारांपैकी दोघांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिल्याने आपण काय करायचे, कोणासोबत जायचे असा प्रश्न सामान्य शिवसैनिकांसमोर आहे. शिंदे यांच्या बंडाबाबत नेमकी कारवाई पक्षाकडून केली जात नसल्याने त्या गटातील संख्या रोज वाढतच आहे. त्यामुळे शिवसैनिकांचा संभ्रम वाढतच चालला आहे. हातातला भगवा कायम ठेवावा की, बंडाचा झेंडा घ्यावा, यात असंख्य शिवसैनिक अडकले आहेत.मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारले आणि शिवसेनेत मोठा भूकंप झाला. दहा-बारा गेले, अजून जाणार अशा चर्चा पहिल्या दिवशी होत्या. दुसऱ्या दिवशीपासून जाणाऱ्यांची संख्या वाढली आणि शिवसैनिक गोंधळले. बंड यशस्वी होणार की पक्ष त्यांना परत आणणार, एवढेच प्रश्न शिवसैनिकांच्या मनात होते.

जिल्ह्यात उदय सामंत (रत्नागिरी), भास्कर जाधव (चिपळूण), राजन साळवी (राजापूर) आणि योगेश कदम (दापोली) हे शिवसेनेचे चार आमदार आहेत. यातील योगेश कदम यांनी सर्वांत आधी शिंदे गट गाठला आणि रविवारी मंत्री उदय सामंत गुवाहाटीला बंडखोर गटात सहभागी झाले.या दोन्ही आमदारांची पक्षातील कार्यकर्त्यांशी उत्तम संबंध आहेत. हे दोघेही शिवसेनेत सक्रिय होण्याच्या आधीपासूनच शिवसेना मजबूत होती. मात्र, या दोघांनी आपापल्या मतदारसंघात ही मजबुती वाढवली आहे. पक्षाइतकेच त्यांच्याशी प्रामाणिक आसलेल्या कार्यकर्त्यांची संख्याही खूप मोठी आहे. त्यामुळेच आता काय करायचे, असा प्रश्न अनेक कार्यकर्त्यांच्या मनात आहे.‘इधर चला मै, उधर चला...’

ज्यांनी बंडात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांच्या मतदारसंघात म्हणजेच दापोली, खेड, मंडणगड आणि रत्नागिरी तालुक्यात कार्यकर्ते संभ्रमित अवस्थेत आहेत. इकडे जायचे की तिकडे हा निर्णय घेताना त्यांना अडचण येत आहे. सध्या कोणी अधिकृतपणे बोलत नसले तरी आपापसात याच विषयाची चर्चा केली जात आहे.

दापोलीत आधीच फेरबदलशिंदे गटात सहभागी झालेल्या आमदारांपैकी योगेश कदम यांच्या मतदारसंघात शिवसेनेत आधीपासूनच दोन गट झाले आहेत. दापोली-मंडणगडच्या नगरपंचायत निवडणुकीत योगेश कदम यांना बाजूला केल्यानंतर पालकमंत्री अनिल परब यांनी तत्काळ संघटनेत फेरबदल केले. योगेश कदम यांच्याशी जवळीक असलेले पदाधिकारी बाजूला करण्यात आले. त्यामुळे तेथे पदाधिकारी बाजूला जाण्याची शक्यता कमी आहे.

सामंत यांची पकड२०१४ मध्ये उदय सामंत शिवसेनेत दाखल झाल्यानंतर त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारी, कार्यकर्तेही शिवसेनेत गेले. यथावकाश त्यांना पदेही दिली गेली. त्यामुळे सद्यस्थितीत अनेक महत्त्वाच्या पदांवर सामंत यांच्याशी जवळीक असलेले पदाधिकारी आहेत. त्यावर सामंत यांची चांगली पकड आहे. सामंत यांनी कामे देऊन अनेकांच्या पोटापाण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यात शिवसेनेला मोठा फटका बसू शकेल.

राष्ट्रवादीशी आघाडी नकोराष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याला शिवसैनिकांचा मुळातच ठाम विरोध होता. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत शिवसेनेसमोर राष्ट्रवादी काँग्रेसचेच आव्हान आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणूक शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी झाली आहे. ज्यांच्याशी सातत्याने विरोधात लढलो आहोत, वाद घातले आहेत, आरोप केले आहेत, त्यांच्यासोबतच एकत्र राहण्याला शिवसैनिकांचा विरोध आहे. त्यामुळे पक्षासाेबत आहोत, असे सांगणाऱ्या अनेक सामान्य शिवसैनिकांनाही एकनाथ शिंदे यांचा मुद्दा पटलेला आहे.आम्ही सामंतांसोबतरत्नागिरी शिवसेनेतील जे पदाधिकारी उदय सामंत यांच्यासोबत शिवसेनेत आले, त्या सर्वांमध्ये यापुढेही सामंत यांच्यासोबतच राहण्याची भूमिका ठाम आहे. अर्थात लोकप्रतिनिधी म्हणून काम करणारे काही पदाधिकारी मात्र द्विधा मनस्थितीत आहेत. एकीकडे सामंत यांची साथ, त्यांचा वरदहस्त हवा असतानाच दुसरीकडे पद सोडावे लागेल, हे दु:खही आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv Senaशिवसेना