चिपळुणात इमारतीवरून पडून दोघांचा मृत्यू

By संदीप बांद्रे | Updated: June 14, 2024 19:52 IST2024-06-14T19:51:39+5:302024-06-14T19:52:31+5:30

यामध्ये खेर्डी शिगणवाडी येथील तरुणासह एका मजूर महिलेचा समावेश आहे.

Two died after falling from a building in Chiplun | चिपळुणात इमारतीवरून पडून दोघांचा मृत्यू

चिपळुणात इमारतीवरून पडून दोघांचा मृत्यू

चिपळूण : शहरानजीकच्या खेर्डी शिवाजीनगर येथे एका इमारतीच्या प्लास्टरचे काम करताना दुसऱ्या माजल्यावरून पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी 1.३० वाजता घडली. लाकडी पलांजा तुटल्याने ही घटना घडली. यामध्ये खेर्डी शिगणवाडी येथील तरुणासह एका मजूर महिलेचा समावेश आहे.

सुरेश मारुती शिगवण (36 खेर्डी शिगवणवाडी) व पूनम दिलीप सहा (40 खेर्डी शिवाजीनगर, मूळची बिहार) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. खेर्डी शिवाजीनगर येथे एका इमारतीच्या प्लास्टरचे काम सुरु होते. त्यासाठी दुसऱ्या माजल्यापर्यंत लाकडी पलांजा बांधण्यात आला होता. त्यातील एक बांबू तुटल्याने त्यावर उभे असलेले दोघेजण दुसऱ्या माजल्यावरून खाली कोसळले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. 

सुरेश मारुती शिगवण याच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. तसेच त्यांची पत्नी गीता शिगवण हिचे वर्षभरापूर्वीच निधन झाले. त्यामुळे त्यांची मुले पोरकी झाली. तसेच पूनम दिलीप सहा यांना चार मुलं असून त्यांचेही मातृत्व हरपले. या घटनेची पोलीस स्थानकात नोंद करण्याचे काम उशिरा पर्यंत सुरु होते.

Web Title: Two died after falling from a building in Chiplun