रत्नागिरीतील कापडगाव येथील बाबासाहेबांच्या स्मारकासाठी पावणेदोन कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 18:59 IST2022-12-05T18:59:02+5:302022-12-05T18:59:47+5:30

सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी जतन करून ठेवणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील कापडगावला भेट दिली

Two crores for Dr. Babasaheb Ambedkar memorial at Kapdgaon in Ratnagiri | रत्नागिरीतील कापडगाव येथील बाबासाहेबांच्या स्मारकासाठी पावणेदोन कोटी

रत्नागिरीतील कापडगाव येथील बाबासाहेबांच्या स्मारकासाठी पावणेदोन कोटी

रत्नागिरी : संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचे जतन केलेल्या कापडगाव (ता. रत्नागिरी) या गावासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने तब्बल पावणेदोन कोटी रुपये मंजूर केले आहेत. या निधीतून भव्य स्मारक, बुद्ध विहार व अन्य वास्तू उभारण्यात येणार आहेत.
‘ऐतिहासिक स्थळ’ म्हणून विकसित होणाऱ्या कापडगावला समता पर्वाच्या निमित्ताने सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी शुक्रवारी (दि. २) भेट देऊन ग्रामस्थांशी थेट संवाद साधला.

संविधान दिनापासून राज्यभर राबविण्यात येणाऱ्या समता पर्वाच्या सातव्या दिवशी दलित वस्तीमध्ये संवादासाठी रत्नागिरीचे सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी जतन करून ठेवणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील कापडगावला भेट दिली.  ऐतिहासिक स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने तब्बल पावणेदोन कोटी रुपये मंजूर केले आहेत.

या कार्यक्रमाला कापडगावचे सरपंच विद्येश कोत्रे, बौद्धजन हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष विश्वास कांबळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कोत्रे, कोकण विपश्यना मेडिटेशन सेंटर पाली -पाथरट संस्थेचे संचालक संतोष आयरे, विजाभज  आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, समाज कल्याण कार्यालय रत्नागिरीचे संतोष खेडेकर, रितेश सोनवणे, हेरिटेज संस्थेचे संस्थाप्रमुख पत्रकार संतोष कांबळे तसेच ग्रामस्थ, महिला, युवक व विद्यार्थी उपस्थित होते. या विहारातील एका कक्षात वाचनालयाचे प्रयोजन असून, ते मंजूर करावे, अशी मागणी सरपंच  विद्येश कोत्रे यांनी केली.

Web Title: Two crores for Dr. Babasaheb Ambedkar memorial at Kapdgaon in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.