शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर दोन कारची टक्कर, ५ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 13:43 IST

Accident Khed Ratnagiri-मुंबई - गोवा महामार्गावर आपेडे फाटा येथे मारुती ब्रिझा आणि टाटा नॅनो या दोन वाहनांमध्ये समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात पाचजण जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास झाला.

ठळक मुद्देमहामार्गावर दोन कारची टक्कर, ५ जखमीमुंबई - गोवा महामार्गावर समोरासमोर अपघात

खेड : मुंबई - गोवा महामार्गावर आपेडे फाटा येथे मारुती ब्रिझा आणि टाटा नॅनो या दोन वाहनांमध्ये समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात पाचजण जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास झाला.या अपघातात नॅनो गाडीच्या चालकाला गंभीर दुखापत झाली असून, ब्रिझा कारमधील चारजण किरकोळ जखमी झाले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र दत्ताराम शिंदे (५७, रा. मुंबई) हे शिमगोत्सवासाठी, ग्रामदेवतेच्या पालखी दर्शनासाठी मुंबई येथून गुहागरला ब्रिझा कारने (एमएच ४७ एसी ३०७३) जात होते. मुंबई - गोवा महामार्गावर कळंबणी गावानजीक आपेडे फाटा येथे समोरून येणाऱ्या टाटा नॅनो कारशी (एमएच १५ ईपी १४७५) त्यांची समोरासमोर टक्कर झाली.या अपघातात दोन्ही गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले, तर टाटा नॅनो कारचा चालक राहुल पवार याला गंभीर दुखापत झाली. त्याला तत्काळ खेडमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. ब्रिझा कारमधील राजेंद्र दत्ताराम शिंदे (५७), निर्मला राजेंद्र शिंदे ( ५३), सायली राजेंद्र शिंदे (१९) आणि ज्योती प्रकाश विचारे (५९) या चौघांना किरकोळ दुखापत झाली. या सर्व जखमींना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. खेडचे उपनिरीक्षक इनामदार कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.

टॅग्स :AccidentअपघातKhedखेडChiplunचिपळुणRatnagiriरत्नागिरी