रत्नागिरी : दुचाकीवरून ट्रीपलसीट भरधाव वेगाने जाताना अचानकपणे कुत्रा आडवा आल्याने चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात दाेन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला, तर अन्य एक जण जखमी झाला आहे. हा अपघात रविवारी (१ फेब्रुवारी) रोजी रात्री पावस - रत्नागिरी मार्गावरील फणसोप हायस्कूलच्या मागे बायपास रस्त्यावर झाला.जयप्रकाश चंद्रिका यादव (वय ५३) आणि त्याचा भाऊ ओमप्रकाश चंद्रिका यादव (वय ५१, दोघेही मूळ रा. गाझीपूर, उत्तर प्रदेश, सध्या रा. फणसोप सडा, रत्नागिरी) अशी मृत्यू झालेल्या दाेघांची नावे आहेत. याबाबत संभाजी बंकट हुलगे (वय २१, मूळ रा. लातूर, सध्या रा. फणसोप सडा, रत्नागिरी) याने शहर पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे.त्यानुसार, रविवारी रात्री जयप्रकाश यादव दुचाकी (एमएच ०८ बीजे ३८५६) वर पाठीमागे त्याचा सख्खा भाऊ ओमप्रकाश आणि संभाजी हुलगे यांना ट्रीपलसीट बसवून पावस ते रत्नागिरी रस्त्याने येत होता. दुचाकी फणसोप हायस्कूलच्या मागे बायपास रस्त्यावर आली असता दुचाकीसमोर अचानकपणे कुत्रा आडवा आला.
त्यामुळे जयप्रकाश यादवचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकी रस्त्याच्या साइडपट्टीच्या बाहेर जाऊन अपघात झाला. यामध्ये रस्त्याच्या बाजूचे चिरे-दगड डोक्याला लागून जयप्रकाश यादव व ओमप्रकाश यादव गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर संभाजी हुलगे यालाही दुखापत झाली.या अपघातप्रकरणी दुचाकीस्वार जयप्रकाश चंद्रिका यादव याच्यावर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १०६ (१), २८१, १२५ (अ), १२५ (ब), माेटारवाहन कायदा कलम १८४ प्रमाणे शहर पोलिस स्थानकात नाेंद करण्यात आली आहे.
Web Summary : In Ratnagiri, two brothers died in a tragic accident after a dog ran in front of their speeding motorcycle, causing the driver to lose control. A third person was injured. The incident occurred on the Pawas-Ratnagiri road.
Web Summary : रत्नागिरी में, एक दुखद दुर्घटना में दो भाइयों की मौत हो गई, जब एक कुत्ता उनकी तेज़ी से चल रही मोटरसाइकिल के सामने आ गया, जिससे चालक नियंत्रण खो बैठा। एक तीसरा व्यक्ति घायल हो गया। घटना पावस-रत्नागिरी मार्ग पर हुई।