शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
4
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
5
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
6
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
7
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
8
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
9
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
10
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
11
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
12
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
13
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
14
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
15
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
16
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
17
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
18
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
19
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
20
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
Daily Top 2Weekly Top 5

सी वर्ल्डवरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

By admin | Updated: August 20, 2015 22:40 IST

मालवणची आमसभा : काँग्रेस, मनसे आक्रमक, वैभव नाईक यांचेही चोख प्रत्युत्तर

चिपळूण : जमीन, पाणी, हवा प्रदूषित करुन मनुष्य, जलचर, पशुपक्षी व शेतीवाडी धोक्यात आणणाऱ्या प्रकल्पांच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. राज्याच्या व पर्यायाने देशाच्या विकासासाठी वरील सूत्र पाळून येणाऱ्या कारखान्यांच्या स्वागतालाही आम्ही तयार आहोत. आम्ही विकासविरोधी नसून, चिरंजिवी विकासासाठी कृतिशील नागरिक आहोत, असे उद्गार नऊगाव मानव हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष हुसैन ठाकूर यांनी काढले. ते कोकाकोला कंपनी व लोटे विस्तारित औद्योगिक क्षेत्रातील जनसंघटनांच्या संयुक्त बैठकीत बोलत होते. या बैठकीत लोटे औद्योगिक विस्तार क्षेत्रात कोकाकोला कंपनी उभारण्याचा निर्णय कंपनीच्या मुख्य प्रतिनिधींनी घोषित केला. उत्साही वातावरणात या घोषणेचे स्वागत करण्यात आले. यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा आशावाद व्यक्त करण्यात आला.यावेळी ठाकूर यांनी कंपनीचे आशुतोष सिंग यांचे स्वागत केले. ठाकूर यांनी विस्तारित औद्योगिक क्षेत्रातील संघर्षाची तसेच प्रस्तावित उद्योगांकडून असलेल्या अपेक्षांची मांडणी केली. डॉ. अशोक शिंदे यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देऊन या क्षेत्रात येणाऱ्या कारखानदारांनी प्रदूषणाची काळजी घेतल्यास व स्थानिकांना रोजगाराची संधी दिल्यास अशा कारखानदारीचे स्वागत करण्यास समिती तयार असल्याची ग्वाही दिली. कोकाकोलाचे उपाध्यक्ष (पब्लिक अपेअर्स) आशुतोष सिंग यांनी कंपनीची उत्पादने, गुंतवणूक, उत्पादन प्रक्रिया, प्रदूषण नियंत्रण व्यवस्था, रोजगार उपलब्धता आदी विषयक विस्ताराने मांडणी करुन पर्यावरण संरक्षणासाठी तसेच प्रकल्प बाधितांसाठी कंपनीकडून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची मांडणी केली व लोकहितासाठी जागृत राहून कृतिशील असणाऱ्या लोकसंघटनांचे कौतुक केले. आजच्या संवाद बैठकीतून कंपनी प्रस्थापनाच्या दिशेने तातडीने सुरुवात करेल, असे त्यांनी सूचित केले. याप्रसंगी कोकाकोलाच्या शरण खन्ना व प्रसाद शिवलकर हे अधिकारी उपस्थित होते. तसेच मानव हक्क संरक्षण समितीचे राजाराम गुणदेकर, अनंत पालकर, इब्राहिम घारे, गंगाराम गोटल, प्रवीण नायनाक व दक्षता समिती, असगणीचे अध्यक्ष गंगाराम इप्ते, सुरेश नायनाक तसेच अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)ग्रामस्थ जमीन, पाणी, हवा प्रदूषित करुन मनुष्य, जलचर, पशुपक्षी व शेतीवाडी धोक्यात आणणाऱ्या प्रकल्पांच्या विरोधात : ठाकूर.कोकाकोला प्रकल्पामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार.स्थानिकांना रोजगार व प्रदूषणमुक्तीचे आश्वासन दिल्यास स्वागत : ठाकूर.