शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १५ तासांनी पूर्ववत; निवळी येथे गॅसवाहू टँकर-मिनी बसचा झाला होता अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 15:39 IST

अपघातात ३० शिक्षक जखमी झाले हाेते. टँकर चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : गॅसवाहू टँकरने मिनी बसला दिलेल्या धडकेत मिनी बसमधील ३० शिक्षक जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी मुंबई-गाेवा महामार्गावरील निवळी (ता. रत्नागिरी) येथे घडली हाेती. अपघातानंतर गॅस गळती झाल्याने सकाळी ९ वाजल्यापासून महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली हाेती. ही वाहतूक १५ तासांनी मध्यरात्री १२:५० वाजता पूर्ववत करण्यात आली.रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथून एलपीजी गॅस घेऊन टँकर (एनएल ०१, एन ४६२८) मुंबईच्या दिशेने जात हाेता. हा टँकर निवळी घाटात आला असता त्याचदरम्यान चिपळूण येथून रत्नागिरीत प्रशिक्षणासाठी शिक्षकांना घेऊन मिनी बस (एमएच ०२, ईआर ९६०३) येत हाेती. निवळी येथे टँकर चालकाचे नियंत्रण सुटले आणि मिनी बसला समाेरून धडक बसली. या धडकेनंतर मिनी बस रस्त्याच्या बाजूला २५ ते ३० फूट खाेल खाली उलटली. अपघातात मिनी बसचालकासह ३० शिक्षकांना दुखापत झाली हाेती.अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती झाल्याने पाेलिसांनी घटनास्थळी तातडीने दाखल हाेत या मार्गावरील सर्व वाहतूक सकाळी ९ वाजता बंद केली. ही वाहतूक उक्षी, संगमेश्वर आणि पाली मार्गे वळविण्यात आली हाेती. त्यानंतर गॅसच्या टाकीवर पाणी मारून गॅस डायल्यूट करण्यात आला. संपूर्ण गॅस निकामी झाल्याची खात्री केल्यानंतर मध्यरात्री १२:५० वाजता महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

टँकर चालकावर गुन्हा दाखलनिवळी येथील अपघात केल्याप्रकरणी टँकरचालक राजेश महावीर यादव (रा. डी संजय काॅलनी, भाटी माईस पतेहपूर बेली, दक्षिण दिल्ली) याच्यावर रत्नागिरी ग्रामीण पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद निवळी काेकजेवठार येथील पाेलिस पाटील संजना पवार यांनी दिली आहे. त्यानुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब), ३२४ (४) व माेटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १८४ प्रमाणे गुन्हा नाेंदविण्यात आला आहे.

दाेन शिक्षकावर उपचार सुरूया अपघातात ३० शिक्षक जखमी झाले हाेते. त्यातील गंभीर जखमी झालेल्या मंदा सुकदेव खाडे (वय ५३, रा. सावर्डे, चिपळूण) यांच्यावर काेल्हापूर येथे उपचार सुरू आहेत तसेच मीना विनायक शिरकर (वय ३८, चिपळूण) यांना अधिक उपचारासाठी साेमवारी पुणे येथे नेण्यात आले आहे. उर्वरित सर्व शिक्षकांवर उपचार करून घरी साेडण्यात आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMumbaiमुंबईgoaगोवाhighwayमहामार्गAccidentअपघातTrafficवाहतूक कोंडी