अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प; कोल्हापूरला जाणारा मार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2021 10:09 IST2021-12-14T10:08:41+5:302021-12-14T10:09:40+5:30

यावर्षीच्या अतिवृष्टीत आंबा घाटात दरड कोसळल्याने रत्नागिरी - कोल्हापूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. आंबा घाट १२ ठिकाणी धोकादायक बनला होता

Traffic jam due to landslide in Anuskura Ghat; Ratnagiri-Kolhapur route closed | अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प; कोल्हापूरला जाणारा मार्ग बंद

अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प; कोल्हापूरला जाणारा मार्ग बंद

राजापूर : घाट माथ्याला जोडणाऱ्या राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटात सोमवारी रात्री दरड कोसळली. यामुळे कोकणातून कोल्हापूर व घाटमार्गावर जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

यावर्षीच्या अतिवृष्टीत आंबा घाटात दरड कोसळल्याने रत्नागिरी - कोल्हापूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. आंबा घाट १२ ठिकाणी धोकादायक बनला होता. या मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या लहान वाहनांची वाहतूक सुरू असून, अवजड वाहनांना बंदी घातली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व वाहतूक अणुस्कुरामार्गे सुरु होती. मात्र, सोमवारी रात्री अचानक या घाटातही दरड कोसळल्यामुळे जिल्ह्यातून होणारी जड वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे. या घटनेनंतर संबंधित यंत्रणा तत्काळ घटनास्थळावर रवाना झाली आहे.

Web Title: Traffic jam due to landslide in Anuskura Ghat; Ratnagiri-Kolhapur route closed