Traffic disruption on Konkan Railway | कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक खोळंबली, नागोठणे-रोहा दरम्यान ट्रॅकवर दरड
कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक खोळंबली, नागोठणे-रोहा दरम्यान ट्रॅकवर दरड

ठळक मुद्देकोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक खोळंबली नागोठणे-रोहा दरम्यान ट्रॅकवर दरड

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील नागोठणे ते रोहा मार्गादरम्यान ट्रॅकवर दरड कोसळल्याने मुंबईहून कोकणात येणाऱ्या गाड्या तुर्तास बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोकणात येणाºया मुंबईकरांचे हाल होणार आहेत.

गणेशोत्सवाच्या काळात विलंबाने धावणाऱ्या गाड्यांमुळे गणेशभक्तांचे हाल झाले होते. त्यातच मुसळधार पाऊस सुरू झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे मुंबईतील रेल्वेसेवा कोलडमली असून, पावसाचा फटका कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांनाही बसत आहे. पावसामुळे गाड्यांचा वेगही मंदावला आहे.

बुधवारी कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नागोठणे ते रोहा मार्गादरम्यान कोकणाकडे येणाऱ्या मार्गावर दरड कोसळली आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर चिखल साचल्याने या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

या मार्गावरील दरड बाजूला करून माती हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरात लवकर ही दरड बाजूला करून मार्ग सुरळीत करण्याचे रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
 


Web Title: Traffic disruption on Konkan Railway
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.