शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

Ratnagiri: पतीचे विवाहबाह्य प्रेमसंबंध, कौटुंबिक जाच; कंटाळून विवाहितेने संपविले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 14:00 IST

पतीसह सासूवर गुन्हा दाखल

चिपळूण : पतीचे विवाहबाह्य प्रेमसंबंध, त्यातून होणारी मारझोड आणि सासूकडून होणारा मानसिक व शारीरिक छळ अशा कौटुंबिक जाचाला कंटाळून खांदाट-मोरवणे फाटा येथील विवाहितेने आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीला आला आहे.शकुंतला अशोक चव्हाण (वय २७, रा. खांदाट, मोरवणे फाटा, चिपळूण) असे तिचे नाव आहे. याबाबत तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती अशोक मोतीराम चव्हाण व सासू कमलाबाई मोतीराम चव्हाण यांच्यावर चिपळूण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतची फिर्याद विनायक जयसिंग राठोड (५५, मूळ रा. जानवळ, ता. चाकूर, जि. लातूर) यांनी दिली आहे. तालुक्यातील खांदाट-मोरवणे फाटा येथील आपल्या राहत्या घरी शकुंतला चव्हाण हिने बुधवारी सकाळी ११:३० ते दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली हाेती. मात्र, ही आत्महत्या आपल्या मुलीने कौटुंबिक जाचाला कंटाळून केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शकुंतला हिचा पती अशोक चव्हाण याचे कामातील एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. यातून घरामध्ये वारंवार वाद होत होते. यादरम्यान अशोक हा शकुंतला हिला मारहाण करत होता. तसेच सासू कमलाबाई चव्हाण याही शिवीगाळ, दमदाटी करत हाेत्या. तसेच ‘तू घरातून निघून जा, मला तुझी गरज नाही,’ असे बोलून तिला वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देत हाेत्या.

या छळाला कंटाळून शकुंतला हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तिच्या वडिलांनी फिर्याद म्हटले आहे. त्यानुसार चिपळूण पोलिसांनी पती व सासू यांच्यावर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १०८, ८५, ३(५) नुसार २६ जून राेजी गुन्हा दाखल केला आहे.