शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri Crime News: सोशल मीडियावर ओळख झाली, महिलेने व्यावसायिकाला घातला ३६ लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 14:11 IST

फिर्यादीला यूएसडीटी ट्रेडिंग करून कमी वेळात जास्त नफ्याचे आमिष दाखवले

रत्नागिरी : सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून महिलेने क्रिप्टो करन्सीमध्ये जादा नफ्याचे आमिष दाखवत एका व्यावसायिकाला तब्बल ३६ लाख ६४ हजार ७४० रुपयांचा ऑनलाइन गंडा घातला. हा प्रकार ४ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसी येथील फिर्यादीच्या गांधी फॅब्रिकेटर्स या दुकानात घडला आहे.याप्रकरणी सुहानी शर्मा आणि डॅनियल (पूर्ण नाव, गाव माहीत नाही) या दोघांविरोधात रत्नागिरी सायबर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, त्याची सोशल मीडियावर सुहानी शर्मा या महिलेशी ओळख झाली होती. महिलेने फिर्यादीचा विश्वास संपादन करून तिचा मित्र डॅनियल हा क्रिप्टो करन्सी मार्केटच्या (ट्रस्टीन कॉईन) या वेब ॲप्लिकेशनचा सीनियर अकाउंट मॅनेजर असल्याचे फिर्यादीला भासवले.त्यानंतर फिर्यादीला यूएसडीटी ट्रेडिंग करून कमी वेळात जास्त नफ्याचे आमिष दाखवले. महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवत तिचा मित्र डॅनियलद्वारे एक लिंक पाठविण्यात आली. फिर्यादीने ही लिंक ओपन करून (ट्रस्टीन कॉईन) या वेब ॲप्लिकेशनमध्ये लॉगिन केले.त्यानंतर फिर्यादीची वेळोवेळी दिशाभूल करून संशयितांनी फिर्यादीला पैसे गुंतवण्यास भाग पाडले. फिर्यादीने वेळोवेळी एकूण ३६ लाख ६४ हजार ७४० रुपये संशयितांच्या सांगण्यावरून गुंतवले. परंतु, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने सोमवारी (दि. २) रत्नागिरी सायबर पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri: Woman swindles businessman of ₹36 lakhs in crypto scam.

Web Summary : A Ratnagiri businessman lost ₹36.64 lakhs to a woman and her accomplice in a cryptocurrency scam. The victim was lured with promises of high returns via a fake web application. Police have registered a case against the accused.