शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षात तब्बल एक हजार सर्पांना जीवदान

By admin | Updated: November 9, 2015 23:40 IST

गणपतीपुळे परिसर : महाविद्यालयीन सर्पमित्रांची कौतुकास्पद कामगिरी

संजय रामाणी -- गणपतीपुळे -रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील रोहीत खेडेकर, पराग केदार, राज देवरुखकर या सर्पमित्र कॉलेज युवकांनी ३ वर्षात सुमारे १००० सर्पांना पकडून त्यांना जीवदान दिले आहे.गणपतीपुळे परिसरात विविध विकासकामे, जंगलतोड तसेच खोदाईची कामे सुरु आहेत. सरपटणाऱ्या प्राण्यांना त्यामुुळे आसरा नसल्याने मनुष्य वस्तीकडे या प्राण्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. या परिसरात नाग, धामण, घोणस, कांडर, अजगर, नाणेरी, हरणटोळ, फुरसे आदी जातीचे साप आढळतात.हे सर्प हातानेच पकडत असल्याचे पराग केदार याने सांगितले. गरज पडल्यासच स्टीकचा वापर केला जातो. ज्या ठिकाणी खूप अडचण असेल व हात पोहोचत नसेल तरच स्टीकचा वापर केला जातो, असे ते म्हणाले.गणपतीपुळे परिसरात या सर्पमित्रांमुळे सापविषयी असणारी भिती किंवा साप दिसल्यावर होणारा मोठा आरडाओरडा, घराशेजारी लाठ्या - काठ्या घेऊन सज्ज असणारा जमाव हे चित्र आता दिसून येत नाही. घरात किंवा परिसरात साप दिसल्यास या सर्पमित्रांना बोलावून या सापाला पकडले जाते. त्यामुळे या परिसरातील साप मारण्याचे प्रमाण ७५ टक्के कमी झाले असून, मागील ३ वर्षात हजार सापांना पकडून जंगलात सोडून दिले असल्याचे रोहीत खेडेकर याने सांगितले.साप पकडल्यानंतर धामण किंवा अजगर असल्यास पोत्यात ठेवण्यात येते तर नाग, कांडर, हरणटोळ, नाणेरी, फुरसे अशा प्रकारचे साप बरणीत किंवा बाटलीत ठेवले जातात. त्या बाटलीला किंवा बरणीला आवश्यक तेवढी भोके ठेवली जातात व लगेचच जिकडे लोकवस्ती नसेल व या सापांना जिकडे खाणं-पिणं मिळेल, अशा ठिकाणी सोडले जाते, असे केदार याने सांगितले.साप किंवा पक्षी जखमी झालेले आढळून आल्यास अशा प्राण्यांना पकडून त्यांच्यावर औषधोपचार करुन पुन्हा त्यांना सोडून दिले जाते. गरज भासल्यास रत्नागिरी येथील सर्पमित्र व प्राणीमित्र यांची मदत घेतली जात असल्याचे राज देवरुखकर याने सांगितले.या परिसरातील व्यक्तीला सर्पदंश झाल्यास दवाखान्यात येईपर्यंत प्राथमिक औषधोपचार केला जातो. तसेच विविध सर्पांविषयी ग्रामस्थांना माहिती दिली जाते. या कामाला परिसरातील ग्रामस्थांचे पाठबळ व शाबासकी मिळत असल्याचे गणपतीपुळे युवकांनी सांगितले.गणपतीपुळे परिसरात विविध विकासकामे, जंगलतोड तसेच खोदाईची कामे सुरु.सरपटणाऱ्या प्राण्यांचा मनुष्यवस्तीत वावर.गणपतीपुळे परिसरात नाग, धामण, घोणस, कांडर, अजगर, नाणेरी, हरणटोळ, फुरसे आदी जातीचे साप.ग्रामस्थांचे मिळतेय पाठबळ.