बिबट्याच्या हल्ल्यात तिघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 11:14 IST2019-03-09T11:14:10+5:302019-03-09T11:14:54+5:30

कुत्र्याच्या शिकारीसाठी आलेल्या बिबट्याने घरात शिरत तिघांना जखमी केले.

Three injured in leopard attack | बिबट्याच्या हल्ल्यात तिघे जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात तिघे जखमी

- सचिन मोहिते 


देवरुख - कुत्र्याच्या शिकारीसाठी आलेल्या बिबट्याने घरात शिरत तिघांना जखमी केल्याची घटना शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर तालुक्यातील आंबवली गावातील खामकरवाडीत घडली. यातील जखमींवर रत्नागिरी शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


      मोहन हरिश्चंद्र खामकर (५०), त्यांची पत्नी मनिषा खामकर (४८) अणि शेजारील श्रद्धा विष्णू खामकर (३५) हे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. प्रथम त्यांना देवरुख ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना लगेचच रत्नागिरीत हलविण्यात आले.


मोहन यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून रक्तस्त्राव झाल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेची माहिती मिळताच देवरुख वनविभागाचे वनपाल सुरेश उपरे, वनरक्षक एनएस गावडे, शर्वरी कदम यांनी पहाटे ५ वाजता घटनास्थळी पिंजऱ्यासह धाव घेतली आणि बिबट्याचा शोध सुरु केला. मात्र बिबट्या आल्या मार्गी परत गेल्याचे स्पष्ट झाले. वनक्षेत्रपाल कांबळे यांनीही घटनास्थळी भेट दिली.

Web Title: Three injured in leopard attack