शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: दवाखान्यात दाखवूया म्हणून मुलाला घेतले, साडेतीन लाखाला विकले; निवळीतील दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 16:34 IST

बेळगावात एका महिन्यात मुलांच्या विक्रीचे तीन प्रकरणे पुढे आली

चिपळूण : बेळगावच्या हुक्केरी तालुक्यातील मुलाच्या विक्री प्रकरणात महाराष्ट्रातील तिघांना हुक्केरी पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडील मुलाला चिपळूणमधून ताब्यात घेतले. हे मूल तालुक्यातील निवळी येथे व त्यानंतर जयगड येथे वास्तव्यास होते. संगीता सोमा हम्मण्णावर ऊर्फ गवळी (४०, रा. माद्याळ, गडहिंग्लज, कोल्हापूर), मोहन बाबाजी तावडे (६४), संगीता मोहन तावडे ऊर्फ संगीता पीरप्पा तळवार (४५, दोघे रा. निवळी, चिपळूण, रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.बेळगावात गेल्या महिन्यात बालिका विक्रीचे एक प्रकरण पुढे आले होते. त्यानंतर हुक्केरीतील आणखी एका प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. एका महिन्यात मुलांच्या विक्रीचे तीन प्रकरणे पुढे आली आहेत. हुक्केरीतील प्रकाराबाबत अर्चना राजू मगदूम (रा. सुल्तानपूर, हुक्केरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजू बसवाणी मगदूम यांच्याशी विवाह झाला होता. अर्चनाचे हे दुसरे लग्न असून, तिला पहिल्या पतीपासून एक मूल आहे. राजू मगदूम याला पहिल्या पत्नीपासून दोन मुले आहेत. मात्र, अर्चनाच्या मुलाची तब्येत चांगली राहत नव्हती. त्यामुळे त्याला पोटाचा विकार असून, शल्य चिकित्सा करायला हवी, असे संगीता सोमू हम्मण्णावर ऊर्फ गवळी हिने सांगितले. तसेच अर्चनाच्या मुलाला दवाखान्याला दाखवूया, असे सांगत तिने मुलाला आपल्याकडे घेतले. तिने मोहन बाबाजी तावडे, संगीता मोहन तावडे ऊर्फ संगीता पिराप्पा तळवार यांचे परिचित असलेल्या दाम्पत्य नंदकुमार डोर्लेकर, नंदिनी डोर्लेकर (रा. वरवडे, रत्नागिरी) यांना हे मूल साडेतीन लाख रुपयांना विकले. ते पैसे संगीता गवळी, मोहन आणि त्याची पत्नी संगीता यांनी वाटून घेतले.या प्रकरणात संगीता गवळी, संगीता तावडे, मोहन तावडे यांना अटक करण्यात आली आहे. नंदकुमार डोर्लेकर, नंदिनी नंदकुमार डोर्लेकर (रा. वरवडे, रत्नागिरी, महाराष्ट्र) यांचा पोलिस शोध घेत आहेत.

आठ दिवसांपूर्वी कराड येथील पोलिस या प्रकरणी चिपळुणात आले होते. त्याप्रमाणे सावर्डे पोलिस स्थानकाकडून त्यांच्या पथकाला साहाय्य करून संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांची बेळगाव व कोल्हापूर पोलिसांमार्फत चौकशी सुरू आहे. - जयवंत गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक, सावर्डे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीbelgaonबेळगावbelgaum-pcबेळगावChiplunचिपळुणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस