शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: दाऊदची मालमत्ता घेणारे भारद्वाज यांना धमक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 11:47 IST

खेड (जि. रत्नागिरी ) : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची तालुक्यातील मुंबके येथील मालमत्ता सरकारी लिलावात घेतलेल्या दिल्ली स्थित ...

खेड (जि. रत्नागिरी) : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची तालुक्यातील मुंबके येथील मालमत्ता सरकारी लिलावात घेतलेल्या दिल्ली स्थित वकील भूपेंद्रकुमार भारद्वाज यांनी स्थानिकांकडून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याची तक्रार खेड पाेलिस ठाण्यात केली आहे. तसेच धार्मिक कार्यासाठी वापरलेल्या त्यांच्या साहित्याचीही चोरी झाल्याचेही नमूद केले आहे. या तक्रारीवरून २६ मार्च रोजी येथील पोलिस स्थानकात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर याची मुंबके या मूळ गावातील मालमत्ता दिल्ली उच्च न्यायालयाचे वकील भूपेंद्रकुमार भारद्वाज यांनी लिलावात खरेदी केली होती. २३ फेब्रुवारी रोजी या मालमत्तेचे भारद्वाज यांच्या नावे हस्तांतरण झाले. दरम्यान, कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर त्याच दिवशी मुंबके येथे जाऊन ॲड. भूपेंद्रकुमार भारद्वाज यांनी सनातन धर्मानुसार होमहवन करण्याचे नियोजन केले होते. मात्र, त्यावेळी या कार्यासाठी रात्र झाल्यामुळे त्या वस्तू त्याच ठिकाणी ठेवल्या होत्या. दुसऱ्या दिवशी पुन्हा होमहवन करण्यासाठी त्याठिकाणी सकाळी भारद्वाज गेले असता धार्मिक पुस्तके, पूजेचे साहित्य तसेच घरगुती वस्तू व सांस्कृतिक मालमत्ता चोरीला गेलेल्या दिसल्या. त्यामध्ये समई, हवन कुंड, स्टीलचे ताटे अशाप्रकारे नऊ हजार चारशे रुपये किमतीच्या वस्तू चोरीला गेल्याची तक्रार भूपेंद्रकुमार भारद्वाज यांनी खेड पोलिस स्थानकात दिली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDawood Ibrahimदाऊद इब्राहिमKhedखेडCrime Newsगुन्हेगारी