शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंतीदिनी धावले हजाराे रत्नागिरीकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 13:27 IST

पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीदिनी आयाेजित केलेल्या फिट रत्नागिरी हॅप्पी मॅरेथाॅन २०२३चे.

रत्नागिरी : पहाटेची थंडी, तरीही पहाटे ५ वाजता रत्नागिरीकर एकत्र आले, प्रत्येकाला ठरलेले अंतर पार करायचे हाेते, जय-पराजयाची चिंताच नव्हती, केवळ तंदुरुस्त राहण्यासाठी धावायचे हाेते. मंंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखविताच १ हजार ५५५ जणांनी धाव घेतली. हे सारे वातावरण हाेते पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीदिनी आयाेजित केलेल्या फिट रत्नागिरी हॅप्पी मॅरेथाॅन २०२३चे.यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये उपस्थित होते. मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना पालकमंत्री उदय सामंत व उपस्थितांच्या हस्ते गौरविण्यात आले.

दरवर्षी शिवजयंतीला सर्व रत्नागिरीकर पहाटे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर असतील असे नियाेजन करा. वर्षाच्या प्रत्येक महिन्यात एका क्रीडा प्रकाराची स्पर्धा यापुढे आयोजित केली जाईल. माणसामधील खिलाडू वृत्ती जागरूक ठेवण्यासाठी क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणे महत्त्वाचे आहे. यामुळे हार पचविण्याची आणि विजयानंतर उन्माद न बाळगण्याची मानसिकता तयार होते. - उदय सामंत, पालकमंत्री.

मॅरेथॉनमध्ये अत्यंत कमी कालावधीमध्ये १ हजार ५५५ जणांनी नोंदणी केल्याने हा मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे. विजेतेपद मिळविण्यापेक्षा स्पर्धेतील सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. या सहभागातून आनंद मिळावा, याकरिता या मॅरेथॉनचे नाव ‘हॅप्पी मॅरेथॉन’ ठेवण्यात आले. - एम. देवेंदर सिंह, जिल्हाधिकारी.

विजेत्यांची नावे (पहिले तीन क्रमांक)२१ कि. मी. महिला- प्रमिला पांडुरंग पाटील, शिल्पा केंबळे, योगिता तांबडकर.पुरुष- सिद्धेश बर्जे, ओंकार बैकर, समाधान पुकळे.१० कि. मी. महिला- साक्षी संजय जड्याळ, प्रिया करंबेळे, शमिका मणचेकर.पुरुष- स्वराज संदीप जोशी, अमेय धुळप, ओंकार चांदिवडे.५ कि. मी. महिला- श्रुती दुर्गवळे, अमिता कुडकर, सिद्धी इंगवले.पुरुष- प्रथमेश चिले, ऋतुराज घाणेकर, नितेश मायंगडे.अठरा वर्षाखालील मुली- रिया स्वरूप पाडळकर, सांची कांबळे, आर्ची नलावडे, राखी थोरे. मुले- अथर्व चव्हाण, श्रेयस ओकटे, सुशांत आगरे, सौरभ घाणेकर.चौदा वर्षाखालील मुली : अनुजा पवार, हुमेरा सय्यद, कार्तिकी भुरवणे.मुले- साईप्रसाद वराडकर, वीर मेटकर, ओम भोरे.दिव्यांग गट- सादिक नाकाडे

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMarathonमॅरेथॉन