ज्यांना भीती वाटत असेल ते एकत्र येत असतील : नीलेश राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 12:36 IST2025-06-09T12:35:28+5:302025-06-09T12:36:02+5:30

'बॅट-बॉल खेळावं की बॅडमिंटन खेळावं, हा त्यांचा प्रश्न'

Those who are afraid will be coming together says Nilesh Rane | ज्यांना भीती वाटत असेल ते एकत्र येत असतील : नीलेश राणे

ज्यांना भीती वाटत असेल ते एकत्र येत असतील : नीलेश राणे

चिपळूण : ठाकरे बंधूंनी एकत्र यावं किंवा नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. ज्यांना भीती वाटत असेल आणि ते एकत्र येत असतील तर आम्ही काय करणार, अशा शब्दांत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आमदार नीलेश राणे यांनी उत्तर दिले.

शिंदेसेनेचे मालवणचे आमदार नीलेश राणे रविवारी चिपळूण दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी नागरिकांची निवेदने स्वीकारून प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, ठाकरे बंधूंनी एकत्र यावं की नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. बॅट-बॉल खेळावं की बॅडमिंटन खेळावं, हा त्यांचा प्रश्न असल्याचे राणे म्हणाले.

चौपदरीकरणाच्या रखडलेल्या कामासंदर्भात ते म्हणाले की, लोकांच्या प्रश्नांसंदर्भात खासदार नारायण राणे यांनी लक्ष घातले असून, ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करीत आहेत. या प्रश्नाबाबत लवकरच तोडगा काढण्यासाठी आम्ही कामाला लागलो आहोत, असे त्यांनी सांगितले.

गोहत्या रोखण्यासाठी रॅकेट मोडावे लागेल

गोवंश वाहतुकीसंदर्भात ते म्हणाले की, मागील दोन अधिवेशनांत हा मुद्दा लावून धरला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोवंश तस्करीप्रकरणी जे लोक दोन-तीन वेळा सापडतील, अशा लोकांवर मोक्का लागू शकतो, असे सांगितले आहे. गोवंश व गोहत्या रोखण्यासाठी महाराष्ट्रातील रॅकेट मोडावे लागेल, असे आमदार नीलेश राणे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Those who are afraid will be coming together says Nilesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.