शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

ZP Election: अजित पवारांना दिवसभरातला तिसरा धक्का! तालुकाध्यक्षांसह शहराध्यक्षांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 16:41 IST

पुणे, कोल्हापूरनंतर रत्नागिरीत अजित पवार गटाला मोठा धक्का

रत्नागिरी: आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर पुणे, कोल्हापूरनंतर रत्नागिरीतराष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. देवेंद्र ऊर्फ बंटी वणजू आणि शहराध्यक्ष अ‍ॅड. राकेश आंब्रे यांनी आपल्या पदांचे तडकाफडकी राजीनामे दिल्याने खळबळ उडाली आहे. महायुतीमधील जागावाटपावरून आणि "गलिच्छ राजकारणाला" कंटाळून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

वाचा: मंत्र्यांच्या सभा गाजविणाऱ्या रणरागिणीला उमेदवारी नाकारली, एकटी लढणार...'आम्हालाच राष्ट्रवादीचा कटू अनुभव आला'काही दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांनी महायुतीत राष्ट्रवादीबद्दल तक्रार केली होती, त्यावर वणजू यांनी सडेतोड उत्तर दिले. "नगरपालिका निवडणुकीत आम्हाला दोन जागा देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात एकही जागा दिली नाही. त्यामुळे कटू अनुभव आम्हालाच आला आहे," असे वणजू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

वाचा: झेडपीसाठी उमेदवारी नाकारताच माजी आमदार पुत्राने ठोकला रामराम, भाजपच्या वाटेवरनिवडणुकीत सक्रिय राहणार नाहीवणजू आणि आंब्रे यांनी भविष्यातील भूमिकेवरही स्पष्ट भाष्य केले आहे. "यापुढे केवळ सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करू, कोणत्याही राजकीय प्रक्रियेत सक्रिय सहभाग नसेल," असे जाहीर केले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर दोन प्रमुख नेत्यांनी 'अलिप्त' राहण्याचा घेतलेला निर्णय राष्ट्रवादीसाठी मोठा फटका मानला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar's NCP Faction Faces Setback: Leaders Resign in Ratnagiri

Web Summary : Ahead of local elections, Ajit Pawar's NCP faction in Ratnagiri suffered a blow as two key leaders resigned, citing dissatisfaction with seat allocation within the Mahayuti alliance and 'dirty politics'. They will remain ordinary workers, impacting NCP's election prospects.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६Ratnagiriरत्नागिरीZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस