शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील लोटेत अमली पदार्थ कारखाना सुरु करण्याचा डाव, अन्...; ठाण्यात सात जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 12:24 IST

कुंतल व उत्तर प्रदेशातील कारखाना चालविणारा संतोष सिंग यांनी मिळून ऑक्टोबर २०२२ मध्ये लोटे येथे ड्रग्ज फॅक्टरी उभारण्याचा प्लान आखला होता

रत्नागिरी : ठाण्याच्या अमली पदार्थविरोधी पथकाने सात जणांना अटक केली आणि त्यातील एका आरोपीच्या मोबाइलमुळे धक्कादायक प्रकार उघड झाला. उत्तर प्रदेशातील अमली पदार्थांच्या कारखान्याला टाळे ठोकण्यात आल्याने आता लोटे औद्योगिक परिसरात कारखाना सुरू करण्याची तयारी या आरोपींनी केली होती. मात्र, त्यांच्या अटकेमुळे हा प्लान फसला आहे. आता हे आरोपी लोटे भागातील कोणाच्या संपर्कात होते का? याची चाचपणी केली जात आहे.मेफेड्रीन या अमली पदार्थाच्या निर्मितीसाठी कारखानाच सुरू करण्याच्या बेतात असलेल्या नफीस पठाण (३३, रा. मुंब्रा) याच्यासह सात जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी मंगळवारी दिली. त्यांच्याकडून चार लाख ६८ हजारांच्या एमडी पावडरसह १४ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एक टोळके परराज्यातून एमडी या अमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे अमली पदार्थविरोधी पथकाने अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या जितेंद्र चव्हाण (३३, रा. कोलशेत, ठाणे) आणि सचिन चव्हाण उर्फ गट्ट्या भाई (३८, रा. कोलशेत रोड, ठाणे) या दोघांना सापळा रचून काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दिनेश कोडमूर (३७, रा. नवी मुंबई) यालाही अटक करण्यात आली. त्याने सात किलो एमडी पदार्थ सलाउद्दीन शेख उर्फ मामा याच्याकडून खरेदी केल्याचे तसेच शेख हा अभिषेक कुंतल उर्फ सरजी याच्यासाठी काम करत असल्याची माहितीही समोर आली. त्याच आधारे सलाउद्दीन शेख (४१, रा. मुंब्रा) आणि अभिषेक कुंतल (५४, रा. रसायनी, रायगड) यांनाही अटक केली आहे.कुंतल हा हरयाणा आणि उत्तर प्रदेशातील अन्य काही लोकांच्या संपर्कात असल्याचे उघड झाले. उत्तर प्रदेशातील एमडी तयार करण्याचा कारखाना रेव्हिन्यू इंटेलिजन्सने बंद केल्याने लोटे औद्योगिक वसाहतीत हा कारखाना सुरू करण्याचा कुंतलचा प्लान होता. त्याचा मोबाइल ठाणे अमली पदार्थविरोधी पथकाने जप्त केल्याने ही माहिती उघड झाली.

जागाही पाहिली होतीकुंतल व उत्तर प्रदेशातील कारखाना चालविणारा संतोष सिंग यांनी मिळून ऑक्टोबर २०२२ मध्ये लोटे येथे ड्रग्ज फॅक्टरी उभारण्याचा प्लान आखला. या दोघांनी खेडमधल्या लोटे एमआयडीसी येथे एक जागा बघून तेथे ड्रग्ज बनविण्यासाठी लागणाऱ्या मशिनही खरेदी केल्या होत्या. मशिन पुरविणाऱ्या दोघांनाही ठाणे पोलिसांनी अटक केली असून, ड्रग्ज बनविण्यासाठी लागणारे रिॲक्टर व सेंटीफ्यूज जप्त केले आहेत, अशी माहिती ठाणे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांनी दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस