शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
5
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
6
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
7
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
8
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
9
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
10
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
11
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
12
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
13
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
14
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
15
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
16
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
17
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
18
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
19
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
20
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप

Ratnagiri: चोरट्यांनी खिडकीतून घरात प्रवेश केला, मानेवर कोयता ठेवून २ लाखांच्या ऐवज लुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 18:16 IST

मंडणगड : मानेवर कोयता ठेवून तीन जणांनी एक घर लुटल्याचा प्रकार तालुक्यातील सडे मानेवाडी येथे घडला आहे. या घरफोडीत ...

मंडणगड : मानेवर कोयता ठेवून तीन जणांनी एक घर लुटल्याचा प्रकार तालुक्यातील सडे मानेवाडी येथे घडला आहे. या घरफोडीत या चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा २ लाख ९१ हजारांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. मंडणगड पोलिस स्थानकात याबाबतची फिर्याद दाखल झाली आहे.या घटनेसंदर्भात फिर्यादी नंदकिशोर परशुराम माने (६५, रा. सडे मानेवाडी) यांनी दाखल केली आहे. ९ एप्रिल रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास जेवण आटोपून ते झोपी गेले. पहाटे २ ते २:३० वाजण्याच्या सुमारास तोंडावर रुमाल बांधलेले तीन लोक माने यांच्या घराच्या स्वयंपाकघराच्या स्लायडिंग खिडकी सरकवून खिडकीच्या वाटेने घरात प्रवेश केला.खिडकी सरकवण्याच्या आवाजाने माने यांना जाग आली. ते बेडवरून उठण्याचा प्रयत्न करत असताना घरात घुसलेल्या चोरट्यांनी त्यांचे हात व पाय टॉवलेच्या मदतीने बांधले आणि त्यांच्या मानेवर घरातील कोयता ठेवून ओरडण्याचा प्रयत्न केलास तर तुला ठार मारू, अशी धमकी दिली.त्यानंतर चोरट्यांनी माने यांच्या तोंडावर चादर टाकून बेडरूममधील कपाटातील रोख २२ हजार रुपये व उशीखाली ठेवलेली २ लाख ३६ हजार रुपये किमतीची सुमारे चार तोळे सोन्याची चेन घेऊन तेथून पलायन केले.मंडणगड पोलिस स्थानकात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०९ (४), ३०५, ३३१ (४), ३५१ (२) (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे.अनेक वर्षांनी घटनाशस्त्राचा धाक दाखवून चोरी झाल्याचा प्रकार रत्नागिरी जिल्ह्यात अनेक वर्षांनी घडला आहे. जिल्ह्यात बंद घरात चोरी करण्याचे प्रमाणच अधिक आहे. त्यामीळे खळबळ उडाली आहे.कोयता त्याच घरातीलघरमालक माने यांना जाग आल्याने चोरट्यांनी त्यांच्या मानेवर कोयता ठेवला. तो कोयता चोरट्यांनी त्याच घरातून घेतला होता, अशी माहिती फिर्यादीमध्ये नमूद आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस