...तर 'मातोश्री'वर काय-काय चालायचं ते उघड करेन; निलेश राणेंनी सेनेला पुन्हा डिवचलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 23:07 IST2019-01-31T22:51:06+5:302019-01-31T23:07:49+5:30

शिवसेना आणि राणे कंपनीचा वादा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. राणेपुत्रांकडून नेहमीच शिवसेनेला लक्ष्य करण्यात येत आहे.

... then I will show you what to do on 'Matoshree'; Nilesh Ranee Sena gets divorced again | ...तर 'मातोश्री'वर काय-काय चालायचं ते उघड करेन; निलेश राणेंनी सेनेला पुन्हा डिवचलं

...तर 'मातोश्री'वर काय-काय चालायचं ते उघड करेन; निलेश राणेंनी सेनेला पुन्हा डिवचलं

रत्नागिरी - खासदार निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचले आहे. मी बाळासाहेबांवर टीका केली. वाटलं होतं शिवसैनिक चवताळतील,  पेठून उठतील. अंगावर येतील, पण तसं काहीच झालं नाही. सगळे हिजडे निघाले, एकाच्यात दम नाही, अशा शब्दात माजी खासदार आणि निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली. राणेंच्या नादाला लागलात तर मातोश्रीच्या माळ्यावर काय काय चालायचे ते उघड करेन, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.

शिवसेना आणि राणे कंपनीचा वादा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. राणेपुत्रांकडून नेहमीच शिवसेनेला लक्ष्य करण्यात येत आहे. कधी निलेश राणे तर कधी नितेश राणे यांच्याकडून शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं जात आहे. गुरुवारी रत्नागिरीतील लक्ष्मी चौकात जाहीर सभेत त्यांनी आमदार व म्हाडा अध्यक्ष उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्यावर कडाडून टीका केली. तसेच शिवसेना आणि शिवसैनिकांवरही अर्वाच्य भाषेत टीका केली. शिवसैनिकांना मनाला ठेच पोहोचेल असे वक्तव्य निलेश राणेंनी केली आहे. मी बाळासाहेबांवर टीका केली. वाटलं होतं शिवसैनिक पेटून उठतील. अंगावर येतील, पण तसं काहीच झालं नाही. सगळे हिजडे निघाले, अशा शब्दात निलेश यांनी शिवसैनिकांना डिवचले आहे. त्यामुळे आता, शिवसेना आणि शिवसैनिक काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

पाहा व्हिडीओ -

Web Title: ... then I will show you what to do on 'Matoshree'; Nilesh Ranee Sena gets divorced again