शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

साडवलीत ट्रकमधील आठ लाखाचा मुद्देमाल चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 15:58 IST

घराशेजारी उभ्या असलेल्या ट्रकमधील मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना साडवली येथे बुधवारी मध्यरात्री घडली आहे. कोल्हापूर येथून ट्रान्सपोर्टचा माल भरून आलेला ट्रक साडवली येथे उभा केला होता. यातील तब्बल ८ लाख १४ हजार ३८७ रूपये किमतीचा माल चोरीला गेल्याची फिर्याद ट्रकमालक सुभाष जाधव यांनी देवरूख पोलीस ठाण्यात दिली आहे.

ठळक मुद्देसाडवलीत ट्रकमधील आठ लाखाचा मुद्देमाल चोरीसचोरीची फिर्याद देवरूख पोलीस ठाण्यात

देवरूख : घराशेजारी उभ्या असलेल्या ट्रकमधील मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना साडवली येथे बुधवारी मध्यरात्री घडली आहे. कोल्हापूर येथून ट्रान्सपोर्टचा माल भरून आलेला ट्रक साडवली येथे उभा केला होता. यातील तब्बल ८ लाख १४ हजार ३८७ रूपये किमतीचा माल चोरीला गेल्याची फिर्याद ट्रकमालक सुभाष जाधव यांनी देवरूख पोलीस ठाण्यात दिली आहे.सुभाष कृष्णा जाधव ( साडवली ) यांनी आपल्या ७०९ (एमएच- ०४ - सीए- ८७४३) या ट्रकमधून कोल्हापूर येथून ट्रान्सपोर्टचा माल आणला होता. हा माल संगमेश्वर येथे न्यायचा होता. खोबऱ्याची पोती, चहा पावडर, मिरची पावडर, हळद पावडर, कापड बंडल आणि सनमायका, प्लायवूड असा लाखोंचा माल ट्रकमध्ये भरला होता. जाधव बुधवारी रात्री उशीरा कोल्हापुरहून साडवली येथे आल्याने हा माल गुरूवारी सकाळी संगमेश्वर येथे पोहोच करू, असे ठरवून त्यांनी आपला ट्रक आपल्या घराशेजारी उभा करून ठेवला होता.रात्री ११.३० ते ५.३० या वेळेत चोरट्याने ही गाडी पळवून नेली व आतील ८ लाख १४ हजार ३८७ रूपयांचा ऐवज लंपास केला. अनावधानाने ट्रकची चावी ट्रकला राहिल्याची संधी चोरट्याने साधल्याची माहिती प्राप्त झाली आहे. गुरूवारी सकाळी जाधव यांचा मुलगा घराबाहेर आला असता त्याला ट्रक जागेवर दिसला नाही. त्याने ही बाब लगेच वडिलांना सांगितली. यावरून जाधव यांनी गाडीची शोधाशोध सुरू केली. जाधव यांना त्यांच्या एका नातेवाईकाचा फोन आला व त्यांनी तुमचा ट्रक कोसुंबच्या माळावर असल्याचे सांगितले.जाधव यांनी कोसुंबचा माळ गाठत गाडी असल्याची खात्री केली. यावेळी ट्रकमधील माल चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. गाडीमधील तब्बल ६ लाख ७० हजार रूपये किमतीची खोबºयाची १४९ पोती, ३३ हजार रूपयांची चहा पावडर, मिरची पावडर, हळद पावडर, कापड बंडल, प्लायवूड आणि सनमायका असा १ लाख ११ हजार ३८७ किमतीचा माल चोरट्यांनी चोरून नेला असल्याचे नमूद केले आहे.साखरप्यात नाकाबंदीचोरीचे स्वरूप लक्षात घेवून श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. मात्र हे श्वान मागोवा घेण्यात अपयशी ठरल्याचे दिसून आले. सायंकाळी उशीरापर्यंत चोरट्यांचा मागोवा घेण्याचे काम देवरूख पोलीसांकडून सुरू होते. यासाठी साखरपा येथेही नाकाबंदी करण्यात आली होती

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरीPoliceपोलिस