इधर चली, मैं उधर चली..., रत्नागिरीतील एस.टी. बसचा व्हिडिओ व्हायरल
By मनोज मुळ्ये | Updated: March 27, 2023 12:01 IST2023-03-27T11:46:28+5:302023-03-27T12:01:18+5:30
एसटी बसचा व्हिडिओ व्हायरल अन् लोकांची झाली करमणूक

इधर चली, मैं उधर चली..., रत्नागिरीतील एस.टी. बसचा व्हिडिओ व्हायरल
रत्नागिरी : शहरातील अंतर्गत रस्ते अजूनही लहान असल्याने शहरी वाहतूक करणाऱ्या बसेस जुन्याच पद्धतीच्या आहेत. पण त्या आता भंगारात काढण्याची वेळ आली आहे. अशीच एक बस रत्नागिरीतील रस्त्यावरुन धावत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यामुळे लोकांची करमणूक झाली. या बसचे धावणे बघून इधर चली.. मैं उधर चली हे गाणेच काहींच्या मनात आले.
रिक्षाचालक जसे तिरके बसतात तशी ही बस रस्त्यावरुन धावत होती. एखादा माणूस तिरका राहून सरळ धावला तर जसे चित्र दिसेल तसे चित्र या बसकडे बघून दिसत होते. शहरातील अंतर्गत रस्ते लहान असल्याने शहरी वाहतुकीसाठी अजूनही जुन्या छोट्या बसेस वापराव्या लागत आहेत. मात्र आता त्या निर्लेखित करण्याची वेळ आली आहे.
इधर चली, मैं उधर चली... धन्य तो ड्रायव्हर... रत्नागिरीतील एस.टी. बसचा व्हिडिओ व्हायरल #STBus#ST#Maharashtra#CMO#StateTransport#Ratnagiri#SocialViral#Trendinghttps://t.co/CbvSFUB0GJpic.twitter.com/teFFZTalSB
— Lokmat (@lokmat) March 27, 2023