शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भाेस्ते घाटातील वळण जीवघेणे; चाैपदरीकरणानंतरही धाेकादायक वळण तसेच, अनेक अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 16:23 IST

कोकणात येण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाट आणि परशुराम घाट हे दोन घाट अत्यंत महत्त्वाचे आहेत.

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील तालुक्यातील भोस्ते घाट चौपदरीकरणानंतर वाहतुकीला सुलभ झाला असला तरी एक तीव्र उतार असलेले नागमोडी वळण मात्र  वाहनचालकांना डोकेदुखी ठरले आहे. गोव्यातून मुंबईच्या दिशेने घाट उतरताना अवजड वाहनांचे या वळणावर चौपदरीकरण काम  झाल्यावर अनेकदा अपघात झाले आहेत. तीव्र उतार  व यू इंग्रजी आकाराचे हे वळण माल वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांच्या अनुभवी चालकांना धोकादायक ठरले आहे.

भोस्ते घाटातील चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, घाटाच्या बाजूला केलेल्या डोंगर कटाईमुळे गेल्यावर्षी तब्बल पाचवेळा भूस्खलन होऊन महामार्गाची एक बाजू पूर्णपणे ठप्प झाली होती.  या घाटात काही ठिकाणी दरड कापण्याचे काम सुरू केले होते.

मात्र, ते सद्य:स्थितीत बंद आहे.  या घाटात ट्रक टर्मिनल तयार करण्याचे कामही सुरू आहे.  मात्र, भोस्ते घाटातील धोकादायक आणि संभाव्य दरड प्रवण क्षेत्रातील दरड अजूनही हटविण्यात आली नाही. तसेच भोस्ते घाटातील अवघड वळणावर सतत होणाऱ्या अपघातांवरही अद्यापही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे घाटातील प्रवास अजूनही सुकर झालेला नाही. पावसाळ्यात जपूनच प्रवास करावा लागणार आहे.

कोकणात येण्यासाठी मुंबई - गोवा महामार्गावरील भोस्ते घाट आणि परशुराम घाट हे दोन घाट अत्यंत महत्त्वाचे आहेत. दुर्दैवाने पावसाळ्यात या घाटात दुर्घटना घडल्यास पर्यटनावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रशासनाने या घाटाला असणारा पर्यायी मार्ग दुरुस्त करून  वाहतुकीसाठी सक्षम करून मार्ग तयार ठेवण्याची मागणी हाेत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीroad transportरस्ते वाहतूक