रत्नागिरी : शहरातील टिळक आळी येथील दुकानाच्या ड्रॉव्हरमधून भर दिवसा चोरट्याने १८ हजार रुपये लांबवले. या चोरीमुळे दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ही घटना काल, बुधवारी (दि.२८) घडली. याबाबत गणेश अशोक रानडे (४०, रा. विश्वेश्वर अपार्टमेंट टिळक आळी, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस स्थानकात तक्रार दिली आहे. गणेश रानडे यांचे टिळक आळी येथील विक्रम प्रसाद आर्केडमध्ये श्रीरंग एंटरप्रायझेस नावाचे जनरल स्टोअर्स आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास एक तरुण त्यांच्या दुकानात आला होता. कोणाचेही लक्ष नाही, हे पाहून त्यांने दुकानातील काउंटरच्या ड्रॉव्हरमधून रोख १८ हजार रुपये चोरून नेले. काही वेळाने ही बाब रानडे यांच्या लक्षात येताच त्यांनी दुकानाबाहेर आणि आजूबाजूला त्या तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो आढळून आला नाही. अखेर त्यांनी शहर पोलिस स्थानकात फिर्याद दिली. अधिक तपास शहर पोलिस करीत आहेत
चोरट्याने भर दिवसा दुकानाच्या गल्ल्यामधून लंपास केली रोकड, रत्नागिरीतील घटना; सीसीटीव्हीत कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 14:18 IST